मंदिराचे बांधकाम सुरु असताना स्लॅब कोसळला : ३ ठार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – मंदिराचे बांधकाम सुरु असताना स्लॅब कोसळून अपघात झाल्याची घटना पिंपळे गुरव येथील स्मशानभूमीजवळ बुधवारी दुपारी घडली. या घटनेत ३ कामगारांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले असल्याचे समजतेय. स्लॅब कोसळला त्यावेळी १० ते १२ जण या स्लॅबखाली अडकली असल्याची माहिती समोर आली आहे. पिंपरी चिंचवडचे अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी स्लॅबच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

मंतोष दास (२९, रा. पिंपळे निलख. मूळ रा. पश्चिम बंगाल), चिदम्मा मनसोप्पा पुजारी (३०, रा. खडकी, पुणे), प्रेमचंद शिबू राजवार (३५, रा. लेबर कॅम्प, सांगवी. बारजापूर नदिया, पश्चिम बंगाल) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

कमलेश कांबळे (१७, रा. विशाल नगर, पिंपळे निलख), आयप्पा मलप्पा तुंबडू (३५, रा. विशाल नगर), सेवा साहू (३०, मूळ रा. बिहार), धनंजय चंदू धोत्रे (२४, रा. मूळ रा. बीड), योगेश मच्छिन्द्र मासळकर (२०, रा. श्रीगोंदा), मलम्मा शरणाप्पा पुजारी, नीलिमा शरणाप्पा पुजारी, कृष्णा पवार, शमोन सरदार अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पिंपळे गुरव गावठाण येथील स्मशानभूमीजवळ महादेव मंदिर असून याचे दीड महिन्यापासून जीर्णोद्धाराचे काम सुरु आहे. मुख्य मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आल्यानंतर मंदिरासमोरच्या सभामंडपाचे काम सुरु होते. या मंदिराचे संपूर्ण दगडी बांधकाम आहे. सभामंडपाचे काम सुरु आहे.

मूळ ठेकेदाराचे दोन कामगार आज सुट्टीवर असल्याने त्याने दुस-या ठेकेदाराकडून दोन बदली कामगार बोलावले होते. काम सुरु असताना दुपारी तीनच्या सुमारास मंदिराच्या सभामंडपाच्या भिंती कोसळल्या. काही क्षणात संपूर्ण सभामंडप जमीनदोस्त झाला. यामध्ये एकूण १२ कामगार अडकले. सर्व कामगार यामध्ये गंभीर जखमी झाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us