जोडीदार घोरत असल्यानं परेशान आहात तर मग ‘या’ सोप्या ट्रीक वापरा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – तुम्ही तुमचा पार्टनर किंवा घरातील एखाद्या सदस्याच्या घोरण्याच्या सवयीने त्रस्त आहात का? पार्टनरच्या घोरण्याने झोपमोड होत आहे का?, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. इंग्लंडच्या स्लीप एक्सपर्टने एक अशी पद्धत सूचवली आहे, जी थोडी वेगळी आहे पण 100% परिणामकारक ठरेल आणि तुम्हाला घोरण्याच्या त्रासातून मुक्त करेल.

घोरणार्‍यांची संख्या वाढली
डॉ. सोफी बोस्टॉक स्लीप एक्सपर्ट आहेत. त्या लोकांना चांगली झोप देण्यासाठी मदत करतात. त्यांचे म्हणणे आहे की, लॉकडाऊनच्या दरम्यान लोकांमध्ये घोरण्याची सवय वाढली आहे. असे यासाठी सुद्धा झाले आहे की, लोक घरातून बाहेर पडत नव्हते आणि शरीरा आवश्यक व्यायाम सुद्धा मिळत नव्हता. तर वाढत्या लठ्ठपणामुळे सुद्धा घोरणार्‍यांची संख्या वाढली आहे.

वजन कमी करणे आहे दूरचा मार्ग
डॉ. सोफी बोस्टॉक म्हणतात, दारू सोडणे आणि वजन कमी केल्याने घोरण्याची समस्या कमी होते. परंतु हा खुप दूरचा रस्ता आहे. अशावेळी त्यांनी एक टेनिस बॉलच्या आधारे घोरण्यावर नियंत्रण मिळवण्याची पद्धत सांगितली आहे.

टेनिस बॉल करेल तुमची मदत
घरात मुले टेनिस बॉलने खेळतात. परंतु, आता एक टेनिस बॉल खरेदी करा. हा बॉल तुमच्या उपयोगी येईल. हा बॉल घोरणार्‍याच्या पाठीच्या मागे ठेवायचा आहे. बहुतांश वेळा व्यक्ती पाठीवर झोपलेली असताना घोरते. परंतु, कुशी बदलताना पाठीच्या मागे बॉल ठेवला तर व्यक्ती पाठीवर झोपणार नाही. आणि घोरणार सुद्धा नाही.

तोंड उघडले गेल्याने घोरतो व्यक्ती
डॉ. सोफी बोस्टॉक म्हणतात की, झोपण्याच्या वेळी जर कुणाचे तोंड उघडे राहात असेल तर यामुळे छातीत हवेचा दाब वाढतो. काही लोक हे रोखण्यासाठी उशीचा आधार घेतात, परंतु डॉ. सोफी बोस्टॉक यांचे म्हणणे आहे की, झोपलेले असताना तोंड बंद राहावे यासाठी मदत करणारी विशेष प्रकारची टेप सुद्धा बाजारात उपलब्ध आहे.