निवांत झोपा सांगून स्वतःच झोपले ; नेटकऱ्यांकडून पाकिस्तानची फिरकी 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भारतीय हवाई दलाने २६ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारस पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक करण्यात आला आहे. पाकिस्तान व्याप्त काश्मिरमधील बालाकोट भागातील जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर हा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये दहशतवादी तळांवर १००० किलो वजनाचा बॉम्ब फेकल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानी हद्दीत घुसून भारतीय वायूसेनेने केलेली ही आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येत आहे.

या हल्ल्यानंतर पाकिस्तानमधील एक ट्विटर अकाऊंट चर्चेत आले आहे. हे ट्विटर हॅण्डल अधिकृत नाही, परंतू या अकाऊंटवरून केलेल ट्वीट हे सध्या चर्चेत आले आहे. पाकिस्तान डिफेन्स, असं या आकाऊंटचे नाव आहे. हल्ल्याच्या तीन तास पूर्वी या अकाऊंटवरून ‘निवांत झोपा कारण पाकिस्तानी हवाई दल जागे आहे.’,असं ट्वीट केलं आहे.

या ट्विटर अकाऊंटच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह आहे, तरी या बायोमध्ये डिफेन्स डॉट पिओके या वेबसाईटचा उल्लेख करत पाकिस्तान जिंदाबाद हा हॅशटॅगही वापरण्यात आला.

https://twitter.com/DefencedotPak/status/1100102364529348608

रात्री १२ वाजून ६ मिनिटांनी हे ट्विट करण्यात आल्यानंतर अवघ्या साडेतीन तासात भारतीय हवाई दलाने पाकिस्तानवर हवाई हल्ला केला. त्यामुळे आता या ट्विटवरुन पाकिस्तानी हवाई दलासह पाकिस्तानलाही ट्रोल करण्यात येत आहे.

https://twitter.com/theskindoctor13/status/1100240461271314437

https://twitter.com/SarcoDiGama/status/1100240067262640128

https://twitter.com/iamalokmishra91/status/1100250218610769920

https://twitter.com/sailorsmoon/status/1100243595649536007

https://twitter.com/pooja27246254_1/status/1100245059297992705