धक्‍कादायक ! प्रेतासोबत झोपल्याने प्रेग्‍नंट झाल्याचा ‘या’ महिलेचा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपण अनेक चित्रविचित्र घटना ऐकत, वाचत असतो. अनेक घटना आपल्याला हैराण करून सोडतात. कधी तु्म्ही ऐकलं आहे का की, एखादी महिला प्रेतासोबत झोपली आणि ती प्रेग्नंट झाली. नक्कीच नसेल ऐकले. आज अशाच काहीशा घटनेबाबत आपण वाचणार आहोत जिथे एक महिला प्रेतासोबत झोपते आणि त्यानंतर ती प्रेग्नंट होते. असं सांगितलं जात आहे की, 38 वर्षीय मॉर्नंग ग्लोरी नावाची महिला कब्रिस्तानमध्ये काम करते. तिने असा दावा केला आहे की, प्रेतासोबत झोपल्याने ती प्रेग्नंट झाली आहे.

या महिलेला प्रेतासोबत सेक्स करण्यामुळे खूप मोठी किंमत मोजावी लागत आहे. तिच्यावर मोठ्या नुकसान भरपाईचा दबाव आहे. ग्लोरी माहिती देताना म्हणाली आहे की, “मला नाही माहीत त्यावेळी मला काय झालं होतं. परंतु मी स्वप्नातही असा विचार केला नव्हता की, मला याची एवढी मोठी किंमत मोजावी लागेल.” प्रेतासोबत सेक्स केल्याच्या काही आठड्यांनंतरच तिला जाणीव झाली की, ती प्रेग्नंट आहे. जेव्हा तिने तपासणी केली तेव्हा डॉक्टरांनी तिला प्रेग्नंट असल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी या महिलेला अटक केली.

अनेकांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांना धक्काच बसला. काहींना तर या गोष्टीवर विश्वासही बसेना की, खरंच ही महिला प्रेतासोबत सेक्स करून प्रेग्नंट झाली आहे.

आरोग्यविषयक वृत्त