काळजी घ्या, कमी झोप घेण्याचा थेट संबंध ‘ब्लड प्रेशर’शी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – आरोग्यासाठी झोप खूप महत्त्वाची आहे. मात्र बदललेल्या जीवनशैलीमुळे अनेकांचा झोपेचा कालावधी कमी झाल्याचे दिसून येते. शिवाय झोपेच्या वेळाही बदलल्या आहेत. ही खूप गंभीर बाब असून चांगल्या आरोग्यासाठी या सवयी टाळल्या पाहिजेत. एका संशोधनानुसार कमी झोप घेणे किंवा पुरेशी झोप घेणे याचा संबंध थेट ब्लड प्रेशरशी असल्याचे समोर आले आहे. यापूर्वी झोप आणि ब्लड प्रेशरचा काही संबंध आहे का याबाबत काहीही माहिती उपलब्ध नव्हती.

नव्या संशोधनात कमी झोप घेणे किंवा झोपेची गुणवत्ता खराब असल्याने होणाऱ्या समस्यांची शक्यता सांगितल्या आहेत. स्टड्ढोक, हार्ट अटॅक आणि हार्ट संबंधी समस्या वाढून मृत्युचा धोका वाढण्यासंबंधी शक्यताबाबत माहिती देण्यात आली आहे. हे संशोधन करणारे शास्त्रज्ञ म्हणतात की, अनेक आजार आहेत ज्यांचां थेट संबंध झोपेशी असतो. यासाठी आम्ही झोप ब्लड प्रेशरला कशी कंटड्ढोल करते हे जाणून घेण्यासाठी हे संशोधन करण्यात आले. या संशोधनात शास्त्रज्ञांच्या पथकाने ३०० लोकांच्या समूहाला एकत्र आणले होते. या समूहात २१ ते ७० वयोगटातील पुरूष आणि महिलांचा समावेश होता. यातील कुणालाही हार्टसंबंधी काही समस्या असू नये याची काळजी घेण्यात आली होती. त्यानंतर सर्वांनाच दोन दिवस पोर्टेबल ब्लड प्रेशर कफ देण्यात आला. या कफच्या माध्यमातून दररोज ४५ मिनिटाच्या अंतराने ब्लड प्रेशरचे रीडिंग घेण्यात आले.

या सहभागी लोकांनी रात्रभर रिस्ट वॉचप्रमाणे एक्टिग्राफी (झोपेची गुणवत्ता मोजणारे यंत्र) घातले होते. या यंत्राने त्यांच्या झोपेची गुणवत्ता मोजली गेली. तसेच जे लोक चांगली झोप घेऊ शकत नाहीत त्यांचे ब्लड प्रेशर वाढले होते, असे आढळले. यातून हे स्पष्ट झाले की, जे लोक पुरेशी झोप घेऊ शकले नाहीत किंवा चांगली झोप घेऊ शकत नाहीत त्यांचे ब्लड प्रेशर वाढले होते. एका रात्रीची पूर्ण आणि चांगली झोप ब्लड प्रेशरला नियंत्रित करू शकते, हेदेखील या प्रयोगातून सिद्ध झाले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/