चांगली झोप न मिळाल्यास होऊ शकतो रक्तदाबाचा त्रास

पोलीसनामा ऑनलाइन टीमझोप आणि रक्तदाब यांचा थेट संबंध असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. यासाठी रात्री उत्तम झोप ही किती महत्वाची आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. बदललेल्या जीवनशैलीमुळे झोपेचा कालावधी कमी झाला आहे. झोपेच्या वेळाही बदलल्या असल्याने त्याचे गंभीर परिणाम मानवी शरीरावर दिसून येतात. चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक तेवढी झोप घेणे गरजेचे आहे. कमी झोप घेणे किंवा पुरेशी झोप घेणे याचा संबंध थेट ब्लड प्रेशरशी आहे.
यापूर्वी झोप आणि ब्लड प्रेशर याचा काही संबंध असल्याचे माहित नव्हते, मात्र, नुकत्याच झालेल्या संशोधनातून ते उघड झाले आहे.
हे संशोधन करणारे शास्त्रज्ञ म्हणतात की, अनेक आजार आहेत ज्यांचां थेट संबंध झोपेशी असतो. यासाठी आम्ही झोप ब्लड प्रेशरला कशी कंटोल करते हे जाणून घेण्यासाठी हे संशोधन करण्यात आले. या संशोधनात शास्त्रज्ञांच्या पथकाने ३०० लोकांच्या समूहाला एकत्र आणले होते. या समूहात २१ ते ७० वयोगटातील पुरूष आणि महिलांचा समावेश होता. यातील कुणालाही हार्टसंबंधी काही समस्या असू नये याची काळजी घेण्यात आली होती. त्यानंतर सर्वांनाच दोन दिवस पोर्टेबल ब्लड प्रेशर कफ देण्यात आला.
या कफच्या माध्यमातून दररोज ४५ मिनिटाच्या अंतराने ब्लड प्रेशरचे रीडिंग घेण्यात आले. या सहभागी लोकांनी रात्रभर रिस्ट वॉचप्रमाणे एक्टिग्राफी (झोपेची गुणवत्ता मोजणारे यंत्र) घातले होते. या यंत्राने त्यांच्या झोपेची गुणवत्ता मोजली गेली. तसेच जे लोक चांगली झोप घेऊ शकत नाहीत त्यांचे ब्लड प्रेशर वाढले होते, असे आढळले. यातून हे स्पष्ट झाले की, जे लोक पुरेशी झोप घेऊ शकले नाहीत किंवा चांगली झोप घेऊ शकत नाहीत त्यांचे ब्लड प्रेशर वाढले होते. एका रात्रीची पूर्ण आणि चांगली झोप ब्लड प्रेशरला नियंत्रित करू शकते, हेदेखील या प्रयोगातून सिद्ध झाले. नव्या संशोधनात कमी झोप घेणे किंवा झोपेची गुणवत्ता खराब असल्याने होणाऱ्या समस्यांची शक्यता सांगितल्या आहेत. स्ट्रोक, हार्ट अटॅक आणि हार्ट संबंधी समस्या वाढून मृत्युचा धोका वाढण्यासंबंधी शक्यताबाबत माहिती देण्यात आली आहे. 
पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like