Sleeping without Clothes : उन्हाळ्यात कपड्यांशिवाय झोपल्यानं होऊ शकतं मोठं नुकसान, जाणून घ्या तज्ञ काय सांगतात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कपड्यांशिवाय झोपायला पाहिजे किंवा नाही? हा प्रश्न नेहमी अनेकांच्या मनात येतो. अनेेक शोधात आढळले आहे की, जे लोक कपडे न घालतात झोपतात त्यांना अनेक फायदे होतात. परंतु उन्हाळ्यात विना कपडे झोपणे (sleep naked ) किती लाभदायक आहे, याबाबत तज्ज्ञांनी मोठा खुलासा केला आहे आणि दावा केला आहे की, उन्हाळ्यात विना कपडे झोपणे (sleep naked ) प्रत्यक्षात नुकसान करणारे आहे.

द सनच्या रिपोर्टनुसार, बूपाच्या क्रॉमवेल हॉस्पिटलचे लीड स्लीप फिजियोलॉजिस्ट ज्यूलियस पॅट्रिक यांनी सांगितले की, विना कपडे बिछाण्यावर झोपल्याने झोपेची गुणवत्ता खराब होते.

sleeping : expert reveals why you should not sleep naked in heatwave and it could actually be making you hotter in night

ज्यूलियस पॅट्रिक यांनी सांगितले की, जेव्हा तुम्ही कपड्यांशिवाय झोपता तेव्हा प्रत्यक्षात शरीरावर घाम जमा होतो आणि तो शरीरावरच राहातो.
यामुळे त्रास होतो आणि झोप खराब होऊ शकते.

sleeping : expert reveals why you should not sleep naked in heatwave and it could actually be making you hotter in night

खराब स्लीपिंग क्वालिटीमुळे तुमच्या आरोग्यावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो.
पूर्ण झोप न घेतल्याने मेंदूला आराम मिळत नाही आणि याच कारणामुळे लोक तणाव आणि मानसिक समस्यांना बळी पडतात.
याशिवाय कमी झोपेचा परिणाम तुमच्या पचनक्रियेवर होतो.

sleeping : expert reveals why you should not sleep naked in heatwave and it could actually be making you hotter in night

रिपोर्टनुसार, यापूर्वी न्यूरोलॉजिस्ट आणि स्लीप फिजिशियन डॉ. गाए लेस्च्जिनर यांनी रेडियो 4 च्या एका शोमध्ये दावा केला होता.
की, नग्न होऊन बिछान्यावर गेल्याने जास्त उष्णता जाणवू शकते.
त्यांनी लोकांना सल्ला दिला की, लोकांनी विना कपडे झोपण्यापेक्षा कपड्यांमध्ये झोपणे चांगले होऊ शकते.

sleeping : expert reveals why you should not sleep naked in heatwave and it could actually be making you hotter in night

एक्सपर्टने सल्ला दिला की, उन्हाळ्यात झोपताना कॉटन सारखे नॅचरल फॅब्रिक घातले पाहिजे.
कॉटनचे कपडे घातल्याने घाम शरीरावर टिकत नाही आणि यामुळे जास्त थंड जाणवते.

sleeping : expert reveals why you should not sleep naked in heatwave and it could actually be making you hotter in night

एक्सपर्ट जरी उन्हाळ्याच्या दिवसात कपडे घालून झोपण्याचा सल्ला देत असले तरी इतर दिवशी विना कपडे झोपणे लाभदायक ठरते.
अनेक स्टडी आणि रिसर्चमध्ये दावा करण्यात आलेला आहे की, विना कपडे किंवा कमी कपड्यात झोपण्याने तुमची स्कीन मोकळेपणाने श्वास घेऊ शकते ज्यामुळे तुमची त्वचा सुंदर होते.
याशिवाय कपडे घालून झोपल्याने शरीरात बॅक्टेरिया निर्माण होण्याचा धोका असतो आणि कमी कपड्यात झोपल्याने तुमच्या प्रायव्हेट जास्त निरोगी आणि सुरक्षित राहतात.

Coronavirus : लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर टेस्ट करणं गरजेचे आहे का? अमेरिकेच्या CDC चं उत्तर, म्हणाले…

नाना पेटोलेंच्या विधानावरून राऊतांनी लगावला टोला, म्हणाले – ‘…तर त्या सारखी ऐतिहासिक गोष्ट नाही’

तुम्ही कोणत्याही कागदपत्रांशिवाय सुद्धा बनवू शकता Aadhaar Card, जाणून घ्या काय आहे पद्धत?

भारतीय महिला फेडरेशनची मागणी, म्हणाले – ‘कष्टकरी, कामगारांना कोरोनाची लस रेशनकार्डवर उपलब्ध करून द्या’