Sleeping Hack | झोप न येण्याच्या समस्येने त्रस्त आहात का? 10-3-2-1 ची ट्रिक करेल काम; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Sleeping Hack | खुप कमी लोकांच्या बाबतीत असे घडते की त्यांना बिछान्यावर पडताच झोप लागते. लवकर झोप न येण्याची समस्या सामान्य आहे. अनेक लोकांना लवकर झोपायचे असते पण झोपू शकत नाहीत (Sleeping Hack). अशाच लोकांसाठी लंडनच्या प्रसिद्ध राज करण यांनी एक ट्रिक सांगितली आहे.

काय आहे 10-3-2-1 मेथड…
डॉक्टर राज यांनी टिकटॉकवर लवकर झोपण्यासाठी जी ट्रिक सांगितली आहे तिला 10-3-2-1 मेथड नाव दिले आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, ही मेथड अवलंबल्याने तुमचे शरीर आपोआप झोपेसाठी स्वताला तयार करू लागते.

10-3-2-1 ट्रिकमधील 10 अर्थ…
डॉक्टर राज यांनी म्हटले, 10 चा अर्थ झोपण्याच्या 10 तास अगोदर कॉफी पिणे बंद करा. कारण शरीरातून तिचा परिणाम नष्ट होण्यास इतका वेळ लागतो. कॅफीन शरीराला उत्तजित करते. या कारणामुळे अनेक लोकांना सुस्ती उडवण्यासाठी कॉफी पिणे आवडते. रात्री 10 वाजता झोपत असाल तर दुपारी 12 नंतर कॅफीनचे सेवन बंद करा.

10-3-2-1 ट्रिकमधील 3 चा अर्थ…
झोपण्यापूर्वी 3 तास अगोदर जास्त प्रमाणात काहीही खाणे बंद करा. सोबतच अल्कोहोल पिणे सुद्ध बंद करा. यामुळे मेंदू शांत राहतो, आणि चांगली झोप मिळते.

10-3-2-1 मेथडमधील 2 चा अर्थ…
बेडवर जाण्यापूर्वी 2 तास अगोदर काम करणे बंद करा. यामुळे मेंदूला रिलॅक्स करण्यास वेळ मिळतो. झोपण्यापूवी सोशल मीडिया पोस्ट पाहणे, मेल्स चेक करत असाल तर सहज झोप येणार नाही.

10-3-2-1 ट्रिकमधील 1 चा अर्थ…
झोपण्यापूर्वी 1 तास अगोदर मोबाइल, कम्प्यूटर, एलईडी लाईट बंद करा, टीव्ही पाहणे एकदम बंद करा.
कारण स्क्रीनमधून निघणाला ब्ल्यू लाईट लेलाटोनिन हार्मोन बनण्यापासून रोखतो, ज्यामुळे झोप उशीरा येते.

Web Title :- sleeping hack health fitness great trick for nod off

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Delta Plus Variant | मुंबईत 60 वर्षीय महिलेचा डेल्टा प्लसने मृत्यू; आरोग्य यंत्रणा ‘अलर्ट’

Skin Care | सनस्क्रीनऐवजी ‘या’ नैसर्गिक गोष्टींचा वापर करा, तुम्हाला चमकणारी त्वचा मिळेल; जाणून घ्या

Pune Corporation | नगरसेवकांच्या निष्क्रियतेमुळे पुणे महापालिकेचे वार्षिक 60 लाखांचे नुकसान