या कारणांमुळे वाढत महिलांचं वजन

पोलीसनामा ऑनलाइन टीम – आजच्या धावपळीच्या जीवनात आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष दिले जात नाही. त्यामुळे स्त्रीयांचे वजन वाढण्याचे प्रमाण खूप जास्त झाले आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक स्त्रीया प्रयत्न करत असतात. व्यायाम, डायटिंग सगळ्या गोष्टी करतात. परंतु आपलं वजन का वाढत याच कारण मात्र आपल्या जवळच असत. पण शोधून मात्र कोणीच काढत नाही.

आताच झालेल्या एका संशोधनातून स्त्रीयांच वजन का वाढत. याच कारण समोर आलं आहे. तर याच सर्वात मोठं कारण आहे. कि ज्या स्त्रीया रात्री लाईट किंवा टीव्हीच्या झोपतात. त्या स्त्रीयांमध्ये वजन वाढण्याचे प्रमाण खूप जास्त आहे.

जेएएमए इंटरनल मेडिसिनच्या संशोधनात हे प्रकाशित करण्यात आले आहे. लाईटच्या कृत्रिम प्रकाशाचा आणि महिलांचे वजन वाढण्याचा खूप जवळचा संबंध आहे. असं या संशोधनातून सिद्ध झालं आहे.

दरम्यान अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेने ४३ हजार ७२२ महिलांचा सर्वे केला त्यात त्यांना असे आढळून आले कि, रात्री टीव्हीच्या किंवा लाईटच्या प्रकाशात ज्या महिला झोपतात त्यांचे १७ टक्के म्हणजे ५ किलो वजन वाढते. त्यामुळे आपण रात्री अंधारातच झोपलं पाहिजे. नाहीतर आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या वाढतात. असं या रिसर्चचे मुख्य लेखक डेल सॅंडलर यांनी सांगितलं आहे.

फेसबुक पेज लाईक करा –