आरोग्यताज्या बातम्या

Sleeping Problem | रात्री तुम्ही सुद्धा उशीरपर्यंत जागता का? ‘ही’ एक गोष्ट खाल्ल्याने 2 मिनिटांत येईल झोप

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Sleeping Problem | प्रत्येक व्यक्तीसाठी झोप (Sleep) खूप महत्त्वाची असते. चांगली झोप न मिळाल्याने लोकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. झोपेच्या कमतरतेमुळे अनेक वेळा लोक खूप चिडचिडे होतात. ही समस्या रात्री उशिरा झोपणार्‍या अनेक लोकांमध्ये दिसून येते. तर अनेकवेळा असे देखील घडते की जेव्हा तुम्ही दिवसा विश्रांती (Take Rest) घेता, तेव्हा तुम्हाला रात्री झोपायला खूप वेळ लागतो. (Sleeping Problem)

 

त्यापूर्वी तुम्ही कोणते काम करत आहात यावरही निद्रानाश अवलंबून असतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. अशा स्थितीत जर तुम्हालाही रात्री लवकर झोप न लागण्याच्या समस्येचा सामना करावा लागत असेल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे.

 

कार्बोहायड्रेटयुक्त अन्न (Carbohydrate Rich Foods) खाल्ल्याने झोप लवकर लागते. Eachnight.com च्या स्लीप एक्सपर्ट रोझी ओस्मुन यांच्या मते, अभ्यासात असे आढळून आले आहे की झोपण्याच्या चार तास आधी कार्ब्ज खाल्ल्याने उशीराने झोप येण्यामधील वेळ कमी करता येतो.

 

त्यामुळे तुमच्या आहारात कार्ब्जचा समावेश करण्याचा प्रयत्न करा. दुसर्‍या अभ्यासात असे दिसून आले आहे की जेव्हा तुम्ही झोपेच्या आधी स्टार्च युक्त कार्ब्ज खाता तेव्हा लवकर झोप येते. (Sleeping Problem)

यासाठी काही लोकांचा अभ्यासात समावेश करण्यात आला होता. सर्व लोकांना झोपण्यापूर्वी भात आणि भाजी खायला घालण्यात आली. पण एके दिवशी जेवणात भाताचा आणखी एक प्रकार समाविष्ट करण्यात आला. द अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या निष्कर्षात असे दिसून आले आहे की जेव्हा लोकांनी झोपण्याच्या चार तास आधी जॅस्मिन राईस खाल्ला, तेव्हा त्यांना झोप येण्यासाठी लागणारा वेळ निम्मा झाला.

 

लोकांना देण्यात आलेल्या जस्मिन राईस (Jasmine Rice) चा ग्लायसेमिक इंडेक्स (Glycemic index GI) जास्त असतो, तर लांब तांदुळाचा जीआय कमी असतो. संशोधकांनी म्हटले की उच्च ग्लायसेमिक इंडेक्स कार्ब्जमध्ये ट्रिप्टोफॅन आणि सेरोटोनिनला प्रोत्साहन देऊ शकतात, हे दोन प्रकारचे केमिकल असतात जी झोपेला प्रवृत्त करतात.

 

उच्च ग्लायसेमिक इंडेक्स कार्ब्ज ते आहेत जे वेगाने तुटतात, ज्यामुळे रक्तातील साखरेमध्ये झपाट्याने वाढ होते. यामध्ये या गोष्टींचा समावेश आहे-

– व्हाईट ब्रेड (White Bread)

– व्हाईट राईस (White Rice)

– पांढरे बटाटे आणि फ्राय (White Potatoes And Fry)

– टरबूज आणि अननस सारखी फळे (Fruits Like Watermelon And Pineapple)

– केक आणि कुकीज (Cakes And Cookies)

 

कमी किंवा मध्यम जीआय असलेले अन्न हळूहळू तुटते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी हळूहळू वाढते (Blood Sugar Level Increase). संशोधनात, हाय जीआय कार्ब्ज असलेले अन्न लवकर झोप आणण्यासाठी फायदेशीर मानले गेले आहे. पण ते पूर्णपणे स्पष्ट नाही.

 

कारण हाय GI कार्ब्जमधे केक, डोनट्स आणि पॅकेज केलेल्या वस्तू जसे की साखरयुक्त पदार्थांचा समावेश असू शकतो – आणि तज्ञ झोपेच्या आधी साखर खाण्याची शिफारस करत नाहीत. याशिवाय वजन कमी करणार्‍यांनी आणि टाइप 1 आणि टाइप 2 मधुमेहाच्या रुग्णांनीही रक्तातील साखरेची पातळी वाढवणारे पदार्थ टाळावेत.

जलद झोप येण्यासाठी फॉलो करा या टिप्स (Follow These Tips For Fast Sleep)

 

दिवसा झोपू नका (Don’t Sleep During The Day) –
दिवसाची दिर्घ डुलकी तुमच्या झोपण्याच्या वेळापत्रकात अडथळा आणू शकते, ज्यामुळे रात्री झोपण्यास उशीर होऊ शकतो.
आवश्यक असल्यास, फक्त 30 मिनिटे डुलकी घ्या.

 

वारंवार वेळ पाहू नका (Don’t Look At Time Too Often)
जर तुम्हाला चांगली झोप हवी असेल तर घड्याळाकडे वारंवार पाहून झोपायला किती वेळ शिल्लक आहे याचा विचार करू नका.
यामुळे तुमचा तणाव वाढेल आणि तुम्हाला झोप यायला जास्त वेळ लागेल.

 

खोलीच्या तापमानाकडे ठेवा लक्ष (Keep An Eye On Room Temperature)
चांगल्या झोपेसाठी तुमच्या खोलीचे तापमान 60 ते 67 डिग्री फॅरेनहाइट दरम्यान असावे.
जर तुमच्या खोलीचे तापमान खूप गरम असेल तर तुमच्या शरीराचे तापमान देखील वाढेल. त्यामुळे तुम्हाला झोप येण्यास खूप त्रास होऊ शकतो.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Sleeping Problem | simple hack that will help you fall asleep

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

ABG Shipyard Scam | देशातील सर्वात मोठा 22 हजार 842 कोटींचा बँकिंग घोटाळा उघडकीस; एबीजी शिपयार्डने 28 बँकांची केली फसवणूक

 

Crude Palm Oil | दिलासादायक ! मोदी सरकारने कच्च्या पामतेलवर कस्टम ड्यूटी कमी केली

 

Multibagger Stock Tata Group | टाटा ग्रुपच्या ‘या’ रिटेल स्टॉकने केली कमाल ! 1 लाख रुपयांचे बनवले 1 कोटी, एक्सपर्ट आहेत ‘बुलिश’

Back to top button