Sleeping Tips | झोपेसंबंधी ‘या’ 5 चुकांमुळे येतंय अकाली वृद्धत्व, तरूण दिसण्यासाठी करा ‘ही’ सुधारणा; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Sleeping Tips | एजिंगसंबंधी समस्यांमुळे मनुष्य आपल्या प्रत्यक्ष वयापेक्षा जास्त वृद्ध दिसू लागतो. एक्सपर्ट सांगतात की, ही समस्या सुधारण्यासाठी लोक आपल्या खाण्या-पिण्यात बदल करतात. जास्त पाणी पितात. परंतु यामध्ये स्लीपिंग रूटीनची (Sleeping Tips) सर्वात मोठी भूमिका असेत, ज्याकडे लोक लक्ष देत नाहीत. झोपेसंबंधीच्या त्या चूका, ज्या मनुष्याला वेगाने वृद्ध करतात त्या जाणून घेवूयात.

1. उशीत लपलेले बॅक्टेरिया –

ज्या उशीचा आधार घेऊन तुम्ही रात्रभर झोपता तिच्यात किती बॅक्टेरिया लपलेले असतात हे तुम्हाला माहित आहे का. शरीरातून निघालेला घाम, मेकअप, डेड स्किन सेल्स, हेयर प्रॉडक्ट किंवा स्किन क्रीममधून तयार झालेले हे बॅक्टेरिया दररात्री तुमच्यासोबत असतात. 2011 मध्ये प्रकाशित एका संशोधनानुसार, एका उशीमध्ये सुमारे साडेतीन लाखपेक्षा जास्त बॅक्टेरिया असू शकतात. यासाठी झोपण्यापूर्वी स्वच्छ उशी घ्या.

2. उशीच्या कव्हरचे मटेरियल –

काही लोक सिल्कचे कव्हर चांगले समजतात. त्याचा पृष्ठभाग खुपच जास्त आरामदायक असतो. रात्री झोपेत त्वचेवर कमी दाब येतो किंवा सुरकुत्या पडण्याची शक्यता कमी असते. सिल्कचा कपडा चेहर्‍याचे नॅचरल ऑईल सुद्धा शोषत नाही. सिल्क (रेशम) मध्ये अमीनो अ‍ॅसिड सुद्धा असते जे कोलेजन प्रॉडक्शनला प्रोत्साहन देते.

3. स्लीपिंग पोझिशन –

यामुळे काहीही फरक पडत नाही की तुम्ही कोणत्या वेळेला झोपता. परंतु जागे झाल्यानंतर तुम्हाला त्वचेत सूज जाणवत असेल तर स्लीपिंग पोझिशन तुम्हाला बदलण्याची गरज आहे. तज्ज्ञ सांगतात की, झोपताना शरीराची हॉरीझोन्टल पोझिशन फ्लूड डिस्ट्रिब्यूशनचा बॅलन्स वरच्या भागात ढकलते. ही तुमच्या फेशियल टिशूला पसरवते आणि याचमुळे त्वचेत तणाव किंवा सूज जाणवते. यासाठी कमरेच्या बळावर सरळ झोपण्याचा सल्ला दिला जातो.

 

4. नाईट क्रीमचा वापर –

एक्सपर्ट सूचवतात की, रात्री झोपण्यापूर्वी नाईट क्रिमने दोन मिनिटांचा फेशियल मसाज आवश्य केला पाहिजे. यासाठी मॉश्चरायजर किंवा फेशियल ऑईलचा वापर करू शकता. सातत्याने हे वापरल्यास त्वचेत रक्ताभिसरण चांगले होईल आणि तुम्ही तरूण दिसू शकता.

5. योग्य झोप –

तज्ज्ञ सांगतात की, प्रत्येक व्यक्तीने किमान 8-9 तासांची झोप घेतली पाहिजे.
हे आपल्या त्वचेसाठी चांगले आहेच, शिवाय यामुळे शरीरसुद्धा ताजेतवाने राहते.
एजिंगच्या समस्येपासून बचाव करण्यासाठी भरपूर पाणी प्या आणि हिरव्या भाज्या आणि फळांचा आहारात समावेश करा.

 

Web Title : Sleeping Tips | common sleep mistakes that could be ageing you skincare experts reveal

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

PMC Parking | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अभिजित बारवकर यांच्या मागणीला यश ! महापालिका गणेशोत्सवासाठी मंडईतील वाहनतळ उद्यापासून सुरू करणार

Maharashtra Cabinet Decision | मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय ! चक्रीवादळाचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी कोकणाला 3 हजार कोटी

Dizo Smartwatch | ‘डीझो’ने भारतात लाँच केल्या 2 बेस्ट स्मार्टवॉच; काय आहे किंमत? जाणून घ्या