Sleeping Tips | ‘या’ पद्धतीने झोपून तर पाहा येईल गाढ झोप, घ्या जाणून

पोलीसनामा ऑनलाइन टीम – धकाधकीच्या जीवनशैलीमुळे काहींना आपल्या शरीराकडे देखील लक्ष द्यायला वेळ नसतो. (Sleeping Tips) तसेच सध्या स्पर्धात्मकयुगामध्ये टिकण्यासाठी सर्वांची धडपड सुरू असेत. त्याचा परिणाम त्यांच्या शारीरिक आरोग्यावर झालेला दिसून येतो. (Sleeping Tips) या धावपळीमध्ये काहींना निवांत झोपही नाही येत. परंतू याच समस्येचा उपाय आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत (Know The Right Posture To Get Good Sleep).

 

– डाव्या कुशीवर झोपा (Sleep On The Left Side)
झोपण्यासाठी सर्वोत्तम स्थिती ही डावी बाजू मानली जाते. ही स्थिती तुमच्या हृदयासाठी फायदेशीर आहे. यामुळे तुमच्या शरीरात वेदना होण्याची शक्यताही कमी होते. गर्भवती महिलांना त्यांच्या डाव्या बाजूला झोपण्याचा सल्ला दिला जातो. (Sleeping Tips) ही पोझिशन्स आई आणि बाळ दोघांसाठीही आरोग्यदायी मानली जातात. डाव्या बाजूला झोपल्याने तुमचे रक्ताभिसरणही (Blood Circulation) चांगले राहते.

 

– पोटावर झोपू नका (Don’t Sleep On Stomach)
पोटावर झोपल्याने तुम्हाला खूप आराम मिळतो, पण पोटावर झोपल्याने तुम्हाला अनेक समस्या उद्भवू शकतात. यामुळे तुमच्या पोटावरच नव्हे तर मानेवर आणि शरीराच्या पाठीवरही दाब पडतो. जर तुम्हाला पोटावर झोपण्याची सवय असेल तर पोटाच्या खालच्याभागात उशी ठेवून झोपणे केव्हाही चांगले. यामुळे तुमच्या पोटावर कमी दाब पडेल.

– अचानक उठू नका (Don’t Get Up Suddenly)
झोपेतून उठताना अचानक उठू नका. सर्व प्रथम,एका कुशीवर व्हा आणि नंतर आरामात उठून बेडवर बसा. असे केल्याने तुम्हाला अचानक चक्कर (Dizziness) येण्याची समस्या देखील होणार नाही.

 

– योग्य उशी वापरा (Use Right Pillow)
चांगल्या झोपेसाठी योग्य उशी निवडणे खूप महत्वाचे आहे. नेहमी शरीरापेक्षा उंच उशी ठेवू नका. खूप जाड किंवा पातळ उशी तुमच्यामानेला इजा करू शकते. पाठ आणि मानदुखीची समस्या (Neck Pain) असल्यास उशीचा वापर करू नका.

 

– सरळ पाठीवर झोपणे (Sleeping On Straight Back)
पाठीवर झोपत जा. कारण पाठीवर झोपल्याने मणक्याला आधार मिळतो. या स्थितीत झोपल्याने तुमची पचनक्रिया (Digestion) चांगली राहते. त्याचवेळी, या स्थितीत झोपणाऱ्यांना जास्त गाढ झोप येते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Sleeping Tips | know the right posture to get good sleep quality

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune News | 6 वर्षीय चिमुकलीच्या पोटात अडकलेली पिन शस्त्रक्रियेद्वारे काढली बाहेर; पुण्यातील ससून हॉस्पीटलमधील डॉक्टरांना यश

 

Pune Crime | पुढे जाण्यास सांगितल्याने हेल्मेट मारुन तरुणाचे नाक केले फ्रॅक्चर; हडपसर मुंढवा रोडवरील घटना

 

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून केला बलात्कार ! नोकरीसाठी पैसे घेऊन घातला 10 लाखांना गंडा