ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन
फुटपाथवर झोपलेल्या एका भाजी विक्रेत्याच्या अंगावर अज्ञात विकृताने उकळते तेल ओतल्याची धक्कादायक प्रकार बदलापूर येथे घडली आहे. या घटनेत भाजी विक्रेता गंभीर भाजला आहे. रात्रीच्या सुमारास बदलापूर रेल्वे स्थानकजवळ असलेल्या स्कायवॉकजवळ ही घटना घडली आहे.
[amazon_link asins=’B074ZF7PVZ,B008V6T1IW’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0c73f37f-b260-11e8-9c66-95b2b236b8d0′]
ड्रीमलॅण्ड बार अॅण्ड रेस्टॉरेन्टमधील कोणीतरी अनोळखी विकृताने हा धक्कादायक प्रकार केला असल्याची तक्रार शिवाजी यांनी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, बदलापूर पश्चिम येथील स्कायवॉक खाली रेल्वे स्टेशन पोलीस चौकीसमोर शिवाजी दास (५५) हे भाजीविक्रीचा व्यवसाय करतात. त्या ठिकाणीच ते फुटपाथवर झोपतात. नेहमीप्रमाणे ते झोपले असताना रात्री अनोळखी व्यक्तीने शिवाजी यांच्या अंगावर उकळते तेल टाकले. त्यात, ते गंभीर भाजले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. उपचारासाठी त्यांना उल्हासनगर मधील मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार जे. एम. सावंत करीत आहेत.
जाहीरात