वजन वाढवायचंय ? आहारात करा ‘या’ 6 पदार्थांचा समावेश

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   ज्याप्रमाणे काही लोक आपलं वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात तसंच अनेकांना त्यांचं वजन वाढवायचं असतं. ज्याप्रमाणे वजन कमी करण्यासाठी काही पदार्थ खाल्ले जातात आणि काही टाळले जातात. त्याच प्रमाणे वजन वाढवण्यासाठी तुम्हाला काही पदार्थ खाण्याची आवश्यकता आहे. वजन वाढवण्यासाठी आपल्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा याची माहिती आज आपण घेणार आहोत.

1) तूप – यात सॅच्युरेटेड फॅट्स आणि काही प्रमाणात कॅलरीज असतात. शरीराला तंदुरुस्त बनवण्यासाठी आहारात तुपाचा समावेश करावा. तुपाचं नियमित सेवन केल्यास वजन वाढायला फायदा होतो. परंतु याचं अतिप्रमाणात सेवन करणं टाळावं.

2) केळी – यात व्हिटॅमिन आणि मिनरल असतात. मध्य स्वरूपाच्या केळीत साधारणपणे 120 कॅलरीज असतात. रोज केळी खाल्ल्यास वजन वाढण्यास फायदा होऊ होतो.

3) बदामाचं दूध – बदाम आणि दुधात मोठ्या प्रमाणात कॅलरीज असतात. यामुळं वजन वाढण्यास मदत होईल. बदामाच्या दुधाचं सेवन केल्यास वजन वाढण्यास नक्कीच फायदा होईल. दुधात बदाम, अंजीर, किशमिश आणि सुकामेवा टाकून सेवन केलं तर शरीर तंदुरुस्त होते.

4) बटाटा- वजन वाढवण्यासाठी जेवणात बटाट्याचा वापर करा. यात प्रोटीन, व्हिटॅमिन, मिनरल, कार्बोहायड्रेट, कॉम्प्लेक्स शुगर असते. यामुळं वजन वाढण्यास फायदा होतो. तळलेला बटाटा खाणं शक्यतो टाळावं.

5) अंडी – प्रोटीनयुक्त पदार्थांचं सेवन केल्यास वजन लवकर वाढेल. अंडी वजन वाढवण्यासाठी खूप फायदेशीर असतात. अंड्यात सॅच्युरेटेड फॅट, प्रोटीन, जीवनसत्व आणि खनिज जास्त प्रमाणात असतात. यामुळं स्नायू मजबूत होतात आणि त्यांची चांगली वाढ होते. अंड्यातील पिवळा भाग काढून सफेद भागाचं नियमित सेवन केलं तर वजन वाढण्यास फायदा होऊ शकतो.

6) गव्हाचा ब्रेड – वजन वाढवण्यासाठी गव्हाच्या ब्रेडचाही खूप फायदा होतो. गव्हाच्या ब्रेडमध्ये शरीराला उपयुक्त असणारी सर्व पोषक तत्वे असतात. यातून आपल्याला कॅलरीज आणि फायबर मिळतं. यामुळं आपल्या शरीराला ऊर्जा देखील मिळते.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.