सेऊलमध्ये ३०० विरुद्ध ३ ; ‘मोदी दहशतवादी’, ‘भारत दहशतवादी’च्या घोषणाबाजीला ‘भारत झिंदाबाद’, ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ने प्रत्युत्तर (व्हिडीओ)

सेऊल(दक्षिण कोरिया) : वृत्तसंस्था – मोदी सरकारने जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड होत आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. अशातच याचे पडसाद जगभरात अनेकठिकाणी उमटत असल्याचे दिसून आले. अशातच भाजपा नेत्या शाझिया इल्मी आणि आरएसएसच्या दक्षिण कोरियाला गेलेल्या काही पदाधिकाऱ्यांनाही याचा अनुभव नुकताच आला. येथील पाकिस्तान समर्थकांनी दिलेल्या ‘मोदी दहशतवादी’, ‘भारत दहशतवादी’ च्या घोषणांना त्यांना तोंड द्यावे लागले. तर या ३०० जणांच्या जमावाला या ३ जणांनी ‘भारत झिंदाबाद’, ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ च्या घोषणांनी प्रत्युत्तर दिले.

यासंदर्भात माहिती भाजपाच्या नेत्या शाझिया इल्मी यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. यासंदर्भातील एक व्हडिओदेखील त्यांनी पोस्ट केला आहे. भारत-पाक तणावाच्या पार्श्वभुमीवर भाजपाच्या नेत्या शाझिया इल्मी या काही आरएसएसच्या पदाधिकाऱ्यांसह दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमध्ये गेल्या असताना तिथे ‘मोदी दहशतवादी’, ‘भारत दहशतवादी’, अशा घोषणा देत पाकिस्तान समर्थक निदर्शने करत होते. यावेळी या निदर्शकांशी बोलण्याचा प्रयत्न त्यांनी केला असता पोलिसांनी हस्तक्षेप करत आरएसएस आणि इल्मी यांना त्यांच्या तावडीतून सोडवले. तसेच या भारतीय ताफ्याने देखील निदर्शकांना प्रत्यूत्तर देत ‘भारत झिंदाबाद’, ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा दिल्या. असे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

काय म्हटले आहे शाझिया इल्मी यांनी :
काल १६ ऑगस्ट रोजी तीन भारतीय नागरिकांनी कोरियाच्या राजधानी सेऊलमध्ये ३०० पाकिस्तानी समर्थकांच्या जमावाला आव्हान दिले. कलम ३७० काढून टाकण्याच्या विरोधात काळे झेंडे दाखवत अभद्र पोस्टर्स आणि घोषणा हा जमाव देत होता.

जम्मू काश्मीर सीमेवर पाकिस्तानच्या कारवाया सुरूच :
दरम्यान जम्मू काश्मीर सीमेवर पाकिस्तानच्या कारवाया सुरूच असून आज नौसेरा क्षेत्रातील भारतीय सैन्याचे एक लान्स नायक शहीद झाले. पण यानंतर भारताने पलटवार करून पाक सैन्याच्या तीन चौक्या नष्ट केल्या आहेत. या कारवाईत पाकिस्तानी लष्कराचे दोन अधिकारी आणि पाच सैनिक ठार झाल्याचेही वृत्त आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like