अमृतांजन पुलाजवळ कंटेनर बंद पडला वाहनांच्या लांबच लांब रांगा

पुणे : पाेलीसनामा ऑनलाईन

मुंबई-पुणे द्रुतगतिमार्गावरील अमृतांजन पुलाजवळ कंटेनर बंद पडल्याने पुण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तसेच बोरघाटत देखील याचा परिणाम जाणवला त्यामुळे तिकडे देखील वाहतूक कोंडी झाल्याच सांगण्यात येत आहे.
[amazon_link asins=’B01DDP7D6W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f596a18d-b63d-11e8-b40d-d5f493f3da4f’]

मुंबईहुन पुण्याच्या दिशेने येणाऱ्या लेन वर अमृतांजन पुलाजवळ कंटेनर बंद पडला होता. ही घटना सकाळी ७ च्या सुमारास घडली आहे. याचाच परिणाम वाहनांवर झाला असून दीड तास झालं वाहतूक ही कासव गतीने सुरू आहे. वाहतूक पूर्वपदावर येत असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे.

अनेक गणेश भक्त हे मुंबईहुन पुण्याकडे आणि कोकणात येत आहेत. त्यामुळे देखील वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागत आहे. अमृतांजन पुलापासून दोन ते तीन किलोमीटर च्या रांगा लागल्या होत्या. आता परिस्थिती पूर्वपदावर येत असून कासव गतीने वाहतूक सुरू आहे.
[amazon_link asins=’B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’041fcb4a-b63e-11e8-b0de-db4c8526cd63′]