मोबाईल ‘कॉल’, ‘डेटा’ दर 40 ते 50 % महागणार

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – भारती एअरटेल, वोडाफोन, आयडिया टेलिकॉम कंपन्यांनी 3 डिसेंबर पासून तर रिलायन्स जिओने 6 डिसेंबर पासून आपले दर वाढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता या सर्व प्रकारचा बोजा ग्राहकांना सहन करावा लागणार आहे. कारण या दरामध्ये तब्बल 50 % नि वाढ होणार आहे. गेल्या पाच वर्षातील ही पहिली दरवाढ आहे. स्पर्धेमुळे या सर्व कंपन्या आर्थिक संकटात सापडलेल्या आहेत.

2014 च्या मानाने यावेळी दरांमध्ये चांगलीच तफावत जाणवते. वोडाफोन आयडियाने इतर नेटवर्क कॉल करण्यावर प्रति मिनिट 6 पैसे दर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राहक प्रथम या तत्वावर आम्ही ठाम आहोत असे म्हणत रिलायन्स जिओने 6 पैसे दर आकारण्याचा बदल्यात जास्तीचा डेटा देत असल्याचे देखील सांगितले आहे.

वोडाफोन आयडियाच्या निवेदनानुसार कंपनीने वार्षिक प्लॅनमध्ये 41.2 % वाढ केली आहे. यानुसार आता हा प्लॅन 1,699 रुपयांवरून वाढून 2,399 रुपये इतका झाला आहे. तसेच रोज दीड जीबी डेटा सह 84 दिवसांच्या प्लॅनचा दर 31 % नि वाढून 458 रुपयांवरून 599 रुपये केला आहे. 199 रुपयांचा प्लॅन आता वाढून 249 रुपयांवर गेला आहे.

एअरटेलच्या वार्षिक प्लॅनसाठी आता वार्षिक 2,398 रुपये खर्च करावे लागणार आहे, या प्लॅनमध्ये देखील 41.14 % नि वाढ करण्यात आली आहे. तर मर्यादित प्लॅनसाठी ग्राहकांना 988 रुपयांऐवजी 1,498 रुपये मोजावे लागणार आहेत. या प्लॅनमध्ये 50 % नी वाढ करण्यात आली आहे. तसेच 82 दिवसांच्या अमर्यादित डेटा प्लॅन आता 698 रुपये होणार आहे.

Visit : policenama.com