Slum Rehabilitation Tender | मुंबईतील धारावी प्रमाणे पुण्यातील झोपडपट्टी पुनर्वसनसाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Slum Rehabilitation Tender | शहरातील वाढत्या लोकसंख्यामुळे पुण्यातील झोपडपट्यांचे लोण देखील वाढले आहे. या वाढत चाललेल्या झोपडपट्यांना आळा घालणे व आहेत त्यांचे पुनर्वसन (Reversion) करणे गरजेचे आहे. पुणे (PMC) आणि पिंपरी-चिंचवड (PCMC) या शहरांतील झोपडपट्यांच्या पुनर्वसनासाठी 2005 साली झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण Slum Rehabilitation Authority (SRA) प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली होती. पण याची प्रक्रिया वेळखाऊ व किचकट असल्याने विकसक झोपडपट्टी पुनर्वसनसाठी पुढे येत नाही. आता मात्र, मुंबईतील (Mumbai) धारावी (Dharavi) प्रमाणे पुण्यातील झोपडपट्ट्यांसाठी एसआरए स्वत: निविदा प्रक्रिया राबवणार आहे. ( Slum Rehabilitation Tender)

 

पिंपरी व चिंचवड दोन शहर मिळून सुमारे साडेपाचशेहून अधिक झोपडपट्टी (Slum Area) वस्ती आहे. याने शहरावर अनेक परिणाम होत असतो. त्याच्या पुनर्वसनासाठी एसआरए प्राधिकरणाची जरी स्थापना करण्यात आली असली तरी तब्बल २३ वर्षांमध्ये फक्त ६१ प्रकल्प मार्गी लागले आहेत. याचे महत्त्वपूर्ण कारण आहे, विकसकाने एसआर योजनासाठी प्रस्ताव दाखल करतानाच 70 टक्के झोपडपट्टीधारकांच्या सहमतीपासून जागेची मालकी, कायदेशीर प्रक्रिया (Legal Process) , बांधकाम परवानगी (Construction Permission) तसेच प्रस्ताव दाखल केल्यानंतरही 19 टप्प्यांची क्लिष्ट प्रक्रिया पूर्ण करावी लागते. यामुळे विकसक पुढे येतच नाही व आले तरी प्रक्रियेमुळे विलंब होतो.

आता मुंबईतील धारावी झोपडपट्टी प्रमाणे पुण्यातही झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून (एसआरए) निविदा प्रक्रियेच्या (Tender Process) माध्यमातून विकसकाची नेमणूक करून स्वत: पुनर्वसनाचे प्रकल्प राबवणार आहे. यासंबंधीची अधिकची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे (Nilesh Gatane) यांनी दिली आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, या प्रकल्पांसाठी पहिल्या टप्यात शहरातील चार ते पाच जागांची निवड करून प्रायोगिक तत्त्वावर हे प्रकल्प राबविण्यात येणार असून, त्याच्या सहाय्याने झोपडपट्टी पुनर्वसनाला गती देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या जागा निश्चित झाल्यानंतर त्यासंबंधीची कार्यवाही पुढे केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

या पुढे प्रकल्पासाठी होणारा उशीर टाळण्यासाठी एसआरए स्वत:च्या स्तरावर पॅनेल (Panel) तयार करून पुनर्वसन योजना राबविण्यात येणाऱ्या
जागांची मोजणीसह अन्य कामे करण्यासाठी संस्थांची नेमणूक करणार आहे. या पॅनेलवरील संस्थांची नेमणूक करून त्यांच्या माध्यमातून
विकसकांना प्रकल्पासाठी आवश्यक असलेली मोजणीसह अन्य कामे वेळेत मार्गी लावणे शक्य होईल, असे गटणे यांनी स्पष्ट केले.
एसआरएच्या या निर्णयामुळे शहरातील झोपडपट्टी पुनर्वसन अधिक जोमाने होऊन प्रक्रियाही लवचिक होण्यास मदत होणार आहे.

 

 

Web Title :  Slum Rehabilitation Tender | Like Dharavi in Mumbai, a tender process will
be implemented for slum rehabilitation in Pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा