2.5 लाखात सुरू करा ‘हा’ व्यवसाय, दरमहा 25000 आणि वार्षिक 3 लाख रुपयांची होईल ‘कमाई’, जाणून घ्या

नवी दिल्ली : कोरोना काळात नोकरीची समस्या असेल तर बिझनेस सर्वात चांगला पर्याय आहे. आज आम्ही एका अशा बिझनेस बाबत सांगत आहोत जो कुणीही व्यक्ती करू शकतो, धुप अगरबत्तीचा बिझनेस. होय, धूप अगरबत्तीचा बिझनेस कमी पैशात सुरू होऊ शकतो. यासाठी सर्वसामान्य माणसाला बिझनेस सुरू करायचा असेल तर हा बिझनेस सोपा आहे.

भारतात अगरबत्ती बनवण्याच्या मशीनची किंमत 35000 रुपयांपासून 175000 रुपयांपर्यंत आहे. या मशीनने तुम्ही 1 मिनिटात 150 ते 200 अगरबत्ती बनवू शकता. अगरबत्तीचा बिझनेस कसा सुरू करायचा आणि त्यामधून किती फायदा होतो ते जाणून घेवूयात…

अगरबत्ती मशीनची किंमत
भारतात या मशीनची किंमत 35000 रुपयांपासून 175000 रुपयांपर्यंत आहे. आटोमॅटिक मशीनने काम सुरू केले तर खुप वेगाने अगरबत्ती बनतात. आटोमॅटिक मशीनची किंमत 90000 ते 175000 रुपयांपर्यंत आहे. एक आटोमॅटिक मशीन एका दिवसात 100 किलो अगरबत्ती बनवते. मशीन निवडल्यानंतर तिचे इंस्टॉलेशन डिलर कडून करून घ्या आणि मशीनवर काम करण्याचे ट्रेनिंग घेणे सुद्धा आवश्यक आहे.

कच्च्या मालाचा पुरवठा
मार्केटमधील चांगल्या सप्लायर्सशी संपर्क साधा. यासाठी अगरबत्ती उद्योगातील लोकांची मदत घेऊ शकता. कच्चा माल नेहमी गरजेपेक्षा जास्त मागवा, कारण काही भाग वेस्ट होत असतो.

अगरबत्ती बनवण्याचे साहित्य
अगरबत्ती बनवण्याच्या साहित्यात गम पावडर, कोळशाची पावड, बांबू, नर्गिस पावडर, सुगंधी तेल, पाणी, सेंट, फूलांच्या पाकळ्या, चंदनाचे लाकूड, जिलेटिन पेपर, शॉ डस्ट, पॅकिंग मटेरियल इत्यादीचा समावेश आहे.

पॅकेजिंग आणि मार्केटिंग
पॅकेजिंगवर उत्पादन विकले जात असल्याने यासाठी एक्सपर्टचा सल्ला घ्या आणि आकर्षक पॅकेजिंग बनवा. अगरबत्तीचे मार्केटिंग करण्यासाठी वृत्तपत्र, टीव्हीमध्ये जाहीरात द्या. शक्य असल्यास कंपनीची ऑनलाइन वेबसाईट तयार करा आणि विविध उत्पादनांचे मार्केटिंग करा.

अगरबत्ती बनवण्यासाठी लागणारा कालावधी
ऑटोमेटिक मशीनवर तुम्ही 1 मिनिटात 150 ते 200 अगरबत्ती बनवू शकता. हाताने करत असाल तर कर्मचार्‍यांच्या क्षमतेवर अवलंबून आहे.

व्यवसाय सुरू करण्यासाठी येणारा खर्च
हा व्यवसाय 13,000 रूपयांच्या खर्चाने घरगुती पद्धतीने हाताने तयार करून सुरू करू शकता. पण मशीन लावणार असाल तर 5 लाख रूपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. लागणार्‍या साहित्याचे प्रमाण कमी किंवा जास्त करून तुम्ही खर्च कमी करू शकता. असे आहेत साहित्याचे दर : कोळसा डस्ट 1 किलो ग्रॅम 13 रुपये, जिगात पावडर 1 किलो ग्रॅम 60 रुपये, सफेद चिप्स पावडर 1 किलो ग्रॅम 22 रुपये, चंदन पावडर 1 किलो ग्रॅम 35 रुपये, बाबू स्टिक 1 किलो ग्रॅम 116 रुपये, परफ्यूम 1 पीस 400 रुपये, डीइपी 1 लीटर 135 रुपये, पेपर बॉक्स 1 डझन 75 रुपये, रॅपिंग पेपर 1 पॅकेट 35 रूपये आणि कुप्पम डस्ट 1 किलो ग्रॅम 85 रुपये आहे.

किती होईल नफा
जर 30 लाखांचा वार्षिक बिझनेस करत असाल तर 10% फायद्यासह तुम्ही 3 लाख रुपये मिळवू शकता. म्हणजे तुम्ही दर महिन्याला 25 हजार रुपयांची कमाई करू शकता.