तुम्ही घराच्या छतावरून करू शकता लाखोंची ‘कमाई’, फक्त 70 हजार रूपयांमध्ये होईल 25 वर्षापर्यंत ‘इनकम’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना काळात नोकर्‍या धोक्यात आल्याने लोकांचा कल बिझनेसकडे जास्त दिसत आहे. तुम्ही सुद्धा घराच्या रिकाम्या छप्पराचा वापर करून लाखो रूपयांची कमाई करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या छप्परावर सोलर पॅनल लावावा लागेल. सोलर पॅनल कुठेही इन्स्टॉल करू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही छतावर सोलर पॅनल लावून वीज बनवून ग्रिडमध्ये सुद्धा सप्लाय करू शकता. वीज सातत्याने महाग होत चालली आहे, ज्याचा थेट परिणाम लोकांच्या घरगुती खर्चावर होत आहे. मात्र, वीज बिल कमी करणे खुप अवघड नाही. सोलर पॅनल लावणार्‍यांना केंद्र सरकारचे न्यू अँड रिन्यूएबल एनर्जी मंत्रालय रूफटॉप सोलर प्लँटवर 30 टक्केंची सबसिडी देते. विना अनुदानित सबसिडीचे रूफटॉप सोलर पॅनल लावण्यासाठी सुमारे 1 लाख रूपयांचा खर्च येतो.

जाणून घेऊयात या स्कीमची पूर्ण प्रोसेस आणि त्यातून होणार्‍या लाभांच्याबाबत…

अगोदर जाणून घेवूयात यामध्ये होणार्‍या खर्चाबाबत –
एका सोलर पॅनलची किंमत सुमारे एक लाख रुपये आहे. प्रत्येक राज्यानुसार हा खर्च वेगवेगेळा आहे. परंतु सरकारकडून मिळणार्‍या सबसिडीनंतर एक किलोवॅटचा सोलर प्लँट कवेळ 60 ते 70 हजार रूपयात इन्स्टॉल होतो. काही राज्य यासाठी आणखी वेगळी सबसिडी देतात. सोलर पॉवर प्लँट लावण्यासाठी जर एकरकमी 60 हजार रुपये नसतील तर, तुम्ही एखाद्या बँकेकडून कर्जसुद्धा घेऊ शकता. अर्थ मंत्रालयाने सर्व बँकाना होम लोन देण्यास सांगितले आहे.

आता जाणून घेवूयात यातून होणार्‍या फायद्याबाबत –
सोलर पॅनलचे आयुष्य 25 वर्षांचे असते. हे पॅनल तुम्ही छप्परवर सहज लावू शकता. आणि पॅनलमधून मिळणारी वीज निशुल्क असेल. सोबतच वाचलेली विज ग्रिडद्वारे सरकार किंवा कंपनीला विकू शकता. म्हणजे मोफत वीजेशिवाय कमाई सुद्धा होईल. जर छप्परावर तुम्ही दोन किलोवॅटचा सोलर पॅनल लावला तर दोन दिवसांच्या 10 तासापर्यंत उन पडण्याच्या स्थितीत यातून सुमारे 10 युनिट विज तयार होईल. जर महिन्याचा हिशेब केला तर सुमारे 300 युनिट विज तयार होईल.

असे खरेदी करा सोलर पॅनल
1 सोलर पॅनल खरेदी करण्यासाठी राज्य सरकारच्या रिन्यूअ‍ॅबल एनर्जी डेव्हलपमेंट अथॉरिटीशी संपर्क साधा.

2 ज्यासाठी राज्याच्या प्रमुख शहरात कार्यालये स्थापन करण्यात आली आहेत.

3 प्रत्येक शहरात प्रायव्हेट डिलरकडे सुद्धा सोलर पॅनल असतात.

4 सबसिडीसाठी फॉर्मसुद्धा अथॉरिटी कार्यालयातून मिळेल.

5 अथॉरिटीकडून लोन घेण्यासाठी संपर्क साधावा लागेल.

दुरूस्तीचा कोणताही खर्च नाही –
सोलर पॅनलमध्ये मेंटनन्सच्या खर्चाचे टेन्शन नाही. परंतु प्रत्येक 10 वर्षात एकदा याची बॅटरी बदलावी लागेल. याचा खर्च सुमारे 20 हजार रुपये असतो. या सोलर पॅनलला एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी सहज नेता येते.

मिळतील पाचशे वॉटपर्यंतचे सोलर पॅनल
सरकारकडून पर्यावरण संरक्षणाचा विचार करून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. गरजेनुसार, पाचशे वॅटपर्यंत क्षमता असलेले सोलर पॉवर पॅनल लावू शकता. याअंतर्गत पाचशे वॅटच्या अशा प्रत्येक पॅनलवर 50 हजार रुपयांपर्यंत खर्च येईल. हे प्लँट एक किलोवॅटपासून पाच किलोवॅट क्षमतेपर्यंत लावता येतील.