खुशखबर ! छोट्या दुकानदारांची ‘ही’ कटकट संपणार, मोदी सरकारचे नवे ‘धोरण’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – छोट्या दुकानदारांना आता दरवर्षी आवश्यक असलेल्या नोंदणीचे नुतनीकरण करण्याच्या त्रासातून मुक्ती मिळणार आहे. लवकर मोदी सरकार देशात ‘वन टाइम लायसन्स’ देण्याच्या धोरणाची घोषणा करु शकते. याअंतर्गत एकदा रजिस्ट्रेशन केल्यावर तुम्हाला पुढील १० वर्षासाठी हे लायसन्स मिळेल. आता मात्र वेगवेगळ्या व्यवसायांसाठी वेगवेगळ्या कायद्यान्वये नोंदणी करावी लागते. यासाठी केंद्र सरकार ‘वन कंट्री – वन टाइम रजिस्ट्रेशन’चे धोरण राबवण्यासाठी घोषणा करणार आहे.

असे असेल वन टाइम लायसन्स

आता दुकानांसाठी आणि बिजनेससाठी वन टाइम लायसन्स मिळणार आहे. म्हणजेच आता तुम्हा दर वर्षी लायसन्स रिन्यू करावे लागणार नाही. एकदा नोंदणी केल्यानंतर तुम्हाला पुढील १० वर्षांसाठी लायसन्स देण्यात येईल. सध्या वेगवेगळ्या व्यवसायांसाठी वेगवेगळ्या कायद्यांतर्गत नोंदणी करावी लागेत. सध्याचे कायदा शॉप अ‍ॅण्ड एस्टॅब्लिशमेंट कायद्याशिवाय इतर १२ पेक्षा आधिक वेगवेगळ्या नोंदणी कराव्या लागतात.

अशाने व्यवसायिकांच्या अडचणी वाढत आहेत. हेच व्यवसाय सहज करण्यासाठी सरकार वन कंट्री – वन टाइम रजिस्ट्रेशनचे धोरण राबवण्याची घोषणा करण्याचा तयारीत आहे. वणिज्य मंत्रालयाने नॅशनल रिटेल ट्रेड पॉलिसी अंतर्गत नवे धोरण इज ऑफ डूइंग बिजनेससाठी कामगार मंत्रालयाने शिफारस केली आहे. याशिवाय शॉप अ‍ॅण्ड एस्टॅब्लिशमेंट कायद्यात बदल केल्यानंतर शिफारस करण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त