निरा नदीवरील बंधाऱ्यांची तातडीने दुरूस्ती होणार : हर्षवर्धन पाटील

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – इंदापूर तालुक्यातील निरा नदीवरील गिरवी, ओझरे, लुमेवाडी येथील बंधाऱ्यांचे पूराच्या पाण्याने मोठे नुकसान व पडझड झालेली आहे. या सर्व बंधाऱ्यांची विलंब न लावता तातडीने दुरूस्ती करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे, अशी माहिती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

निरा नदीवरील गिरवी बंधाऱ्यांची गुरूवारी(दि. १५) हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्त्यांसमवेत पाहणी केली. पुराच्या पाण्याने या बंधाऱ्यांची मातीची संपुर्ण एक बाजू वाहुन गेली आहे. त्यामुळे नागरीकांचे बंधाऱ्यांवरून होणारे दळणवळण बंद पडले आहे. या पाहणीच्या वेळी हर्षवर्धन पाटील यांनी तहसिलदार सोनाली मेटकरी व जलसंपदाचे उपअभियंता कुलकर्णी यांचेशी दूरध्वनीवरून चर्चा केली. निरा नदीवरील सर्व बंधाऱ्यांची तातडीने दुरूस्ती करावी, असे यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

निरा नदीवरील गिरवी व इतर अनेक बंधारे नादुरुस्त झाल्याने पाण्याअभावी शेतीचे मोठे नुकसान होणार असल्याचे शेतकऱ्यांनी यावेळी हर्षवर्धन पाटील यांना सांगितले. यावेळी इंदापूर तालुका काॅग्रेस कमिटीचे अध्यक्ष अ‍ॅड. कृष्णाजी यादव, जि.प. सदस्या अंकिता पाटील, उदयसिंह पाटील, संजय बोडके, शंकरराव घोगरे, महादेव घाडगे, ज्ञानदेव क्षीरसागर, सरपंच रेखा कोरे, विद्या क्षीरसागर, पोपट कोरे, शंकर क्षीरसागर, शिवाजी क्षीरसागर, मारूती क्षीरसागर, रामलिंग जगताप, विजय क्षीरसागर व कार्यकर्ते उपस्थित होते.

आरोग्यविषयक वृत्त –