तीन वर्षाच्या मुलीसह विवाहितेची विहिरीत उडी मारून आत्महत्या

सांगली : पोलीसनामा

सांगली येथील घनश्याम नगर येथे रविवार सकाळी आठच्या सुमारास एका विवाहितेने आपल्या तीन वर्षाच्या मुलीसोबत विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. पूजा राजेश चौगुले, वय २१ वर्षे व सृष्टी राजेश चौगुले वय 3 वर्षे ( रा.विकास नगर ) अशी मृतांची नावे आहेत. घटनास्थळी संजयनगर पोलीस दाखल झाले असून मृतदेह विहिरीतून काढण्याचे काम सुरू आहे. आत्महत्येचे कारण अद्याव स्पष्ट झाले नसल्याचे संजयनगर पोलिसांनी सांगितले.