वीज दरवाढीच्या विरोधात लघुउद्योग संघटनेचे आंदोलन

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

महावितरणने प्रस्तावित वीज दरवाढ त्वरित मागे घ्यावी. या मागणीसाठी पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेच्या वतीने आज मंगळवारी महावितरणच्या भोसरी विभागीय कार्यालयासमोर पिंपरी चिंचवड लघुउदयोग संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
[amazon_link asins=’B01L8ZI7U0′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’955ff0e5-9a3f-11e8-b4f4-c3fb01f827c8′]

लघुउदयोग संघटनेचे अध्यक्ष संदिप बेलसरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. प्रवेश व्दारासमोर झालेल्या आंदोलनात वीज बिलांची होळी करण्यात आली. यावेळी जयंत कड, प्रमोद राणे, निस्सार सुतार, संजय सातव, संजय ववले, विनोद नाणेकर, नितीन बनकर, प्रविण लोंढे, हर्षल थोरवे, संजय आहेर, दिपक फल्ले, दिपक मोडवे, शिवाजी साखरे, विनोद मित्तल, नवनाथ वायाळ, भरत नरवडे, अतुल कंक, अतुल ईनामदार, सुनिल शिंदे, शांताराम पिसाळ, सचिन आदक, महादेव कवितके, अशोक अगरवाल, सुरेश जपे, शिवाजी पाटील, प्रकाश ढमाले, बशीर तरसगार, गणेश माळी, चांगदेव कोलते, शशिकांत सराफ, सुरेश जरे, हंबीरराव आवटे, संजय तोरखाडे, सुहास केसकर, विजय भीलवाडे, रमेश ढाके, प्रभाकर धनोकार, मोहिनी जगताप, अशोक पाटील आदींसह शेकडो लघुउद्योजक उपस्थित होते.

महावितरणच्या मनमानी धोरणाचा निषेध करताना पिंपरी चिंचवड लघुउदयोग संघटनेचे अध्यक्ष संदिप बेलसरे म्हणाले की, महावितरणचा ३०८४२ कोटी रु.तुटीची भरपाई मागणारा वीज दरवाढीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे सादर केला आहे. हा प्रस्ताव म्हणजे भ्रष्टाचाराला संरक्षण देणारा उद्योजक व राज्यसरकारची लुट करणारा व उद्योगाकांची दिशाभूल करणाऱा आहे. या प्रस्तावास पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचा तीव्र विरोध आहे. महावितरण कंपनीने २१३४०८ दशलक्ष युनिट विजेची विक्री केली त्याची तुलना ३०४८२ कोटी रु.शी केल्यास सरासरी दरवाढ १ रु.४५ पै. इतकी होते. महावितरण कंपनी ने दाखल केलेल्या प्रस्तावानुसार २ वर्षातील वीज विक्री २,१३,४०८ दशलक्ष युनिट व जादा वसुली ३०४८२ कोटी आहे. याचा स्पष्ट अर्थ सरारारी दरवाढ १.४५ रु.प्रति युनिट असा आहे. इ.स. २०१७ -१८ या वर्षासाठी आयोगाने मान्यता दिलेल्या सरासरी ६.६३ रु. प्रति युनिट या दराशी तुलना करता ही वाढ २२ % इतकी आहे. ही २२ % वाढ २०१९-२० मध्ये ही लागू आहेच असे असताना १९-२० साठी कोणतीही वाढ नाही असा तांत्रिक अनैतिक दावा प्रसिद्धी पत्रकात करण्यात आला आहे.

आयोगाचे ०१.०४.२०१८ पासून सध्याचे उच्च दाब औदयोगिक वीज ग्राहक यांच्यासाठी रु.८.६३ प्रति युनिट असून (३३ के वि ), लघु दाब औद्योगिक वीज ग्राहक यांचेसाठी २७ एचपी वरील ग्राहकासाठी रु.९.२९ व २७ एचपी खालील ग्राहकांसाठी रु.६.३७ आहे. प्रास्ताविक वीज दर अनुक्रमे रु.१०, रु.११ व रु.७.०६ प्रति युनिट असा असणार आहे.
[amazon_link asins=’B002U1ZBG0′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9ddcf26d-9a3f-11e8-bbae-036c625b4116′]

महावितरणने ८ पै.ने दाखवलेली वीज दरवाढ फसवी आहे. स्थिर आकार वहन आकार, इंधन समायोजन याचा परिणाम वीजदर वाढीवर एकत्रित होत असतो त्यामुळे औद्योगिक ग्राहकाला याचा मोठा फटका बसणार आहे. उच्चदाब व लघुदाब औद्योगिक ग्राहकांच्या वीज आकारात २ टक्के वाढ केल्याचे दिसत असले तरी स्थिर आकाराच्या वाढीमुळे या ग्राहकाला अनुक्रमे १८.४ व १६ टक्के दरवाढ होणार आहे.