हा ‘जपानी फंडा’ वापरून दूर करा ‘मानसिक ताण’ ! ‘हे’ 8 महत्वाचे मुद्दे जाणून घ्या

कामाचा ताण ही समस्या सध्या सामान्य झाली आहे. कारण कामाचे स्वरूप आता खुप बदलले आहे. अनेकजण आठतासापेक्षा जास्त तास काम करतात. शिवाय, सतत कामाचा ताण राहील्याने मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. कामाच्या ठिकाणी, ऑफिसमध्ये जर एखादं छोटं रोप कुंडीत लावलेले असेल तर ते स्ट्रेस कमी करण्यास लाभदायक ठरते, असे जपानमधील ह्योगो युनिव्हर्सिटीमध्ये करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून समोर आले आहे.

रिसर्चमधील महत्वाचे मुद्दे

1 आजूबाजूला प्लांट्स म्हणजेच झाडे असल्याने मूड चांगला राहतो. आरोग्यही चांगलं राहतं.

2 झाडामुळे खासकरून इनडोअर प्लांट्समुळे मानसिक आणि शारीरिक त्रास मोठ्याप्रमाणात कमी केला जाऊ शकतो.

3 आजही अनेक लोक या गोष्टीवर विश्वास ठेवत नाहीत की, कामाच्या ठिकाणी छोटी प्लांट्स ठेवल्याने मानसिक ताण कमी करण्यास मदत मिळते.

4 या रिसर्चमध्ये 63 अशा कर्मचार्‍यांचा समावेश करण्यात आला जे एकाच डेस्कवर तासंतास बसून काम करतात होते.

5 थकवा आल्यावर प्लांटकडे पाहिल्यावर मूडवर प्रभाव पडतो.

6 कामाच्या ठिकाणी असलेल्या प्लांटचा व्यक्तीवर सकारात्मक प्रभाव पडतो.

7 प्लांटकडे बघितलं किंवा नाही बघितलं तरी सुद्धा व्यक्तीचा स्ट्रेस कमी होतो.

8 कामाच्या ठिकाणी ठेवलेले छोटे झाड मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारचा तणाव कमी करते. अधिक शांत आणि सकारात्मक वाटते.