home page top 1

छोटा रावण पिस्तूलासह ताब्यात

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

कासारवाडी परिसरातील भाई छोटा रावण याच्याकडे पिस्तुल असल्याची माहिती मिळाल्यानंतर पिंपरी पोलिसांनी सापळा रचून त्याच्यासह दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक गावठी बनावटीचे लोखंडी पिस्तुल आणि जिवंत काडतुसे असा २५ हजार ६०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
[amazon_link asins=’B072BXZWFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8ab735f2-8a41-11e8-b88a-21002c963104′]

पिंपरी आंबेडकर चौकात एक सराईत गुन्हेगार येणार असून त्याच्याकडे पिस्तुल असल्याची माहिती पिंपरीचे अन्सार शेख यांना मिळाली. त्यानुसार सहायक निरीक्षक रामदास मुंडे, शेख आणि त्यांच्या पथकाने सापळा  रचला. रॉक्सी हॉटेल शेजारील टपरीवर सिगारेट ओढत असलेल्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता एकाकडे पिस्तुल आणि दुसऱ्याकडे जिवंत काडतुसे आढळून आली. छोटा रावण आणि त्याचा साथीदार दोघेही अल्पवयीन आहेत. या छोट्या रावणने पिस्तुल कश्यासाठी आणले याचा तपास सुरू आहे. त्याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत.

Loading...
You might also like