×
Homeताज्या बातम्याSmall Saving Scheme | पैशांची असेल गरज तर 'या' 2 बचत योजनांवर...

Small Saving Scheme | पैशांची असेल गरज तर ‘या’ 2 बचत योजनांवर मिळते चांगले कर्ज; जाणून घ्या व्याजदर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Small Saving Scheme | आपण अशा दोन योजनांबाबत जाणून घेणार आहोत ज्या गुंतवणुकीदरम्यान चांगले व्याज देतात. ज्या कमीत कमी पैशात सुरू करता येऊ शकतात आणि यासाठी वेळेचे बंधन नाही. त्या किती वर्ष सुरू ठेवायच्या आहेत तेवढी वर्ष ठेवू शकता. शिवाय कमी व्याजदरात कर्जाची सुविधा सुद्धा (Small Saving Scheme) मिळते.

या आहेत त्या 2 योजना

1. किसान विकासपत्र योजना (Kisan Vikas Patra)

किसान विकासपत्र योजनामध्ये वार्षिक 6.9 टक्केच्या दराने व्याज मिळते. केव्हीपी भारत सरकारद्वारे जारी एक वन टाइम इन्व्हेस्टमेंट स्कीम आहे.
जेथे ठरलेल्या कालावधीत तुमचे पैसे दुप्पट होतात. याचा मॅच्युरिटी पीरियड सध्या 124 महीने आहे.
यामध्ये किमान गुंतवणूक 1,000 रुपयांची करता येते.
कमाल गुंतवणुकीसाठी कोणतीही मर्यादा नाही.

2. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना (National Savings Certificate)

एनएससीमध्ये सध्या 6.8 टक्के वार्षिक व्याज मिळत आहे. एनएनसी सर्टिफिकेट 1000, 5000 चे मिळतात. यामध्ये गुंतवणूक करण्याची कोणतीही मर्यादा नाही.
तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार एनएससी खरेदी करू शकता.
एनएससीमध्ये प्रत्येक वर्षी 1.5 लाख रुपयेपर्यंत करण्यात आलेल्या गुंतवणुकीवर आयकर कायदा कलम 80 सी प्रमाणे टॅक्स सूट मिळते.

 

अल्पबचत योजनांवर कर्ज

बँक ऑफ बडोदानुसार, जर शिल्लक कालावधी तीन वर्षापेक्षा कमी असेल तर या दोन छोट्या बचत योजनांवर 85% पर्यंतचे कर्ज घेता येऊ शकते.
जर मॅच्युरिटी काळ तीन वर्षापेक्षा जास्त शिल्लक असेल कर्जाची रक्कम आणखी कामी होऊन 80% पर्यंतच कर्ज मिळू शकते.
एक व्यक्ती ओव्हरड्राफ्ट सुविधेसाठी सिक्युरिटी गहाण ठेवू शकतो. (Small Saving Scheme)

भारतीय स्टेट बँकेच्या वेबसाइटनुसार, या उत्पादनांवर जवळपास 11.9% व्याजदर वसूल केले जाते.
गुंतवणुकदार ही उत्पादने केवळ बँका, बिगर-बँकिंग कंपन्या, सार्वजनिक आणि खासगी महामंडळे, सरकारी कंपन्या आणि स्थानिक प्राधिकरण संस्थांकडे गहाण ठेवू शकतात.

 

Web Title : Small Saving Scheme | small saving scheme need money good loan is available on these two savings schemes

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune News | केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवारांची फर्स्ट एड पॉलिक्लिनिकला भेट; लहू बालवडकर यांच्या कामाचे केले कौतुक

7th Pay Commission | 31 % DA झाल्यानंतर 56000 रुपये बेसिक पगार घेणार्‍यांना वर्षात मिळतील 2 लाख रुपये, जाणून घ्या गणित

Worli Atria Mall | ‘हिजाब’ घातल्याने महिलेला Resto रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाकारला; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News