छोट्या बचत योजनेत करताय गुंतवणूक ?, मोदी सरकार घेणार ‘हा’ निर्णय, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – छोट-छोट्या बचतीसाठी छोट्या बचत योजना खूप महत्वाच्या मानल्या जातात. या योजना सुरक्षित असतात, तसेच परतावा देखील चांगला मिळतो. जर तुम्हीही छोट्या बचत योजने(Savings plan)त गुंतवणूक करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. वास्तविक येत्या तिमाहीत म्हणजेच ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत पीपीएफ, एनएससी, सुकन्या या छोट्या बचत योजनां ( Savings plan) च्या व्याज दराबाबत निर्णय होणार आहे.

असे मानले जात आहे की, यावेळी व्याज दरात वाढ होऊ शकते. म्हणजे व्याज म्हणून मिळणारा नफा वाढू शकतो. यापूर्वी जुलै-ऑगस्ट-सप्टेंबर या तिमाहीत व्याज दर स्थिर ठेवले होते.

सरकारकडून दर तीन महिन्याला छोट्या बचत योजनेच्या व्याजदराचा आढावा घेतला जातो. हा आढावा घेताना व्याज दर वाढवण्याचा किंवा कमी करण्याचा निर्णय घेतला जातो. जेव्हा व्याज दर वाढते, तेव्हा गुंतवणूकदारांना अधिक नफा मिळतो. तर व्याज कपात केल्यास नफा कमी होतो.

सध्या पीपीएफचे व्याज दर ७.१ टक्के आहे, तर ज्येष्ठ नागरिक बचत योजनांचे व्याज दर ७.४ टक्के आहे. सुकन्या समृद्धि योजनेत गुंतवणूकीवर ७.६ टक्के व्याज मिळते. ही योजना मुलींसाठी सुरू केली गेली होती.