PPF, NSC, सुकन्यामध्ये पैसे गुंतवणार्यांसाठी महत्वाची बातमी, आता 30 सप्टेंबरपर्यंत मिळणार ‘एवढं’ व्याज
नवी दिल्ली : केंद्र सरकारने अपेक्षेच्या उलट पब्लिक प्रॉव्हिडंट फंड आणि पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाऊंटसह सर्व स्मॉल सेव्हिंग स्कीममध्ये केलेल्या गुंतवणुकीवर जुलै-सप्टेंबर तिमाहीसाठी मिळणार्या व्याजाच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. मात्र, पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाऊंटमध्ये अजूनही 4 टक्केच व्याज मिळते. तर, 1 पासून 5 वर्षांच्या पोस्ट ऑफिस डिपॉझिटवर व्याजाचा दर 5.5 ते 6.7 टक्केच्या दरम्यान कायम राहील. यापूर्वी अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती की, सरकारी बॉन्डच्या यील्डमधील घसरणीमुळे छोट्या बचत योजनांमध्ये करण्यात आलेल्या गुंतवणुकीचा व्याजदर जुलै-सप्टेंबर 2020 तिमाहीसाठी घटवला जाऊ शकतो. असे म्हटले जात होते की, पीपीएफचे व्याजदर 46 वर्षानंतर 7 टक्क्यांच्या खाली जाऊ शकतात.
सीनियर सिटिजन सेव्हिंग स्कीमवर 7.40 टक्के व्याज
सरकारकडून सांगण्यात आले की, 5 वर्षांच्या रिकरिंग डिपॉझिटवर 5.8 टक्क्यांच्या दराने व्याज मिळेल. तर, सीनियर सिटिजन सेव्हिंग स्कीममध्ये करण्यात आलेल्या गुंतवणुकीवर लोकांना 7.40 टक्केदराने व्याज मिळेल. याशिवाय मंथली इन्कम स्कीमवर 6.6 टक्के व्याज मिळेल. पीपीएफवर मागच्या तिमाहीत 7.1 टक्केच्या दराने व्याज मिळत होते. आता जुलै-सप्टेंबर 2020 तिमाहीमध्ये सुद्धा गुंतवणुकदारांना इतकेच व्याज मिळत राहील. तर, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये गुंतवणुकीवर 6.8 टक्के दराने व्याज मिळेल.
सुकन्या समृद्धी योजनेवर सर्वात जास्त 7.6 टक्के व्याज
किसान विकास पत्रावर गुंतवुकदारांना 6.9 टक्के दराने व्याज देण्यात येणार आहे, जे 124 महीन्यामध्ये मॅच्युर होईल. सर्व स्मॉल सेव्हिंग स्कीममध्ये सर्वात जास्त व्याज सुकन्या समृद्धी योजनेत करण्यात आलेल्या योजनेवर मिळेल. मुलींसाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर 7.6 टक्के दराने व्याज मिळेल. याच्या उलट फायनान्शियल सिस्टममध्ये जास्त रोकड असणे आणि लोनमधील कमतरतेमुळे बँक डिपॉझिट्सवर मिळणार्या व्याजाच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया 5 ते 10 वर्षांच्या फिक्स्ड डिपॉझिटवर 5.4 टक्केच्या दराने व्याज देत आहे.
31 जुलैपर्यंत केलेल्या गुंतवणुकीवर मिळणार इन्कम टॅक्स सूट
केंद्र सरकार 2016 पासून तिमाही आधारावर स्मॉल सेव्हिंग स्कीमवर मिळणार्या व्याजाचे पुनरावलोकन करते. यापूर्वी व्याजदरांमध्ये वार्षिक आधारावर बदल करण्यात येत होता. एप्रिल-जून 2020 तिमाहीमध्ये सरकारने पीपीएफवर मिळणार्या व्याजाचा दर 0.8 टक्के घटवून 7.1 टक्के केला होता, म्हणजे जानेवारी-मार्च 2020 तिमाहीत यावर 7.9 टक्केच्या दराने व्याज मिळत होते. बहुतांश नोकरदार या स्कीममध्ये गुंतवणूक करून इन्कम टॅक्समध्ये सूट मिळवतात. तर, लॉकडाऊनमुळे सरकारने गुंतवणुकीचा कालावधी 31 जुलै 2020 पर्यंत वाढवला आहे. म्हणजे 1 एप्रिल पासून 31 जुलै 2020 च्या दरम्यान करण्यात आलेल्या गुंतवणुकीवर लोक आर्थिक वर्ष 2019-20 साठी इन्कम टॅक्स सूटचा लाभ घेऊ शकतात.