COVID च्या छोट्या-छोट्या लक्षणांकडे दुर्लक्ष करताय? तर आजाराचं रूप गंभीर होऊ शकतं, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशात कोरोनाने थैमान घातले आहे. मात्र मागच्या दोन दिवसात बाधितांची संख्या कमी होऊ लागले आहे. अनेक व्यक्तीमध्ये कोरोना संसर्गाचे लक्षणे दिसून पण अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. मात्र, कोरोनाची बाधा झाल्याचं तात्काळ आणि वेळेवर त्यावर निदान करणे आवश्यक आहे. त्यामध्ये बेजबाबदारपणा केल्यास अथवा त्याकडे दुर्लक्ष केल्यास क्षुल्लक आणि सामान्य लक्ष देखील गंभीर होऊ शकतात. म्हणून छोट्या छोट्या लक्षणावर लक्ष ठेवणे आणि वेळेवर उपचार करणे गरजेचे आहे.

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, कोरोनामध्ये सायकोटाइन हॅपी हायपॉक्सिया यांमुळेही कमी कालावधीत रुग्णांची परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. म्हणून कोरोनाची बाधा झाल्यास असे काही शंका आल्यास त्याच्या पहिल्या दिवसापासूनच दक्ष राहणे आवश्यक आहे. तसेच काही लक्षणे असल्यास व्यक्तीने काळजी करणे गरजेचं आहे. नाहीतर तेच लक्षणे अधिक प्राणघातक ठरू शकतात. असे तज्ज्ञाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, कोरोनाची बाधा झालेल्या व्यक्तीमध्ये सुरुवातीस सौम्य लक्षणं दिसतात. परंतु शरीरातला संसर्ग वाढत गेला तर आजाराचं रूप गंभीर होऊ शकतं. मग रुग्णालयात दाखल करावं लागत.

तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार –

कोरोना संसर्गाबाबत जागरूक न राहणं किंवा आपल्याला कोरोना झाला असल्याची शक्यता टाळत राहणं नंतर भारी पडू शकतं. सुरुवातीला साधी दिसणारी लक्षणं, त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यास केव्हा गंभीर बनतात, ते कळत नाही. म्हणूनच थोडीशी जरी शंका आली, तरी वैद्यकीय सल्ला घेणं गरजेचं आहे.

य सल्ल्यानुसार उपचार घ्यावेत. या दरम्यान, कोरोनाची लागण झालेल्या प्रत्येकाला स्टेरॉइड देण्याची गरज नाही. सौम्य लक्षणांच्या रुग्णांवर याचा वापर केल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते. म्युकरमायकोसिस या काळ्या बुरशीजन्य आजार निर्माण झाला आहे, स्टेरॉइड्सच्या चुकीच्या वापरामुळेही ही समस्या निर्माण होऊ शकते, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

तज्ज्ञ डॉक्टरचा सल्ला घेणं गरजेचे –

गृह विलगीकरणात राहून उपचार घेत असलेल्या रुग्णांकडून काही वेळा हा सल्ला घेतला जात नाही. म्हणून औषध योजनेची अंमलबजावणी चुकीची होऊ शकते. म्हणून तज्ज्ञ डॉक्टरचा सल्ला घेणं हे सर्वांत महत्त्वाचं आहे.

या दरम्यान, कोरोना संक्रमणाचे स्वरूप आणि लक्षणं संभ्रमात टाकणारी असल्यामुळे अनेकदा लोकांकडून चाचणी करायला उशीर होतो. म्हणून निदान उशिरा होतं आणि त्यामुळे औषधोपचारांना उशीर होतो. यामुळे शरीरावर परिणाम होऊ शकतो. म्हणून, अलग महत्वाचे असते. SPO2 म्हणजे रक्तातल्या प्राणवायूची पातळी आणि ताप या गोष्टींवर वारंवार लक्ष ठेवणं आवश्यक आहे. प्राणवायूची पातळी ९२ पेक्षा कमी होत असेल, तर तात्काळ दखल घ्यायला हवी. तसंच, एखाद्या व्यक्तीचा ताप सातव्या दिवसापर्यंत कमी होत नसेल, तर तीही धोक्याची घंटा आहे. उच्च रक्तदाब आणि डायबेटीस म्हणजे मधुमेहाच्या रुग्णांनी तर या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही. असे तज्ज्ञांच्या माहितीनुसार सांगण्यात आले आहे.