‘स्मार्ट सिटी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप ‘कार्यमुक्त’, बदली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप (आयडीईएस) यांना कार्यमुक्त करण्यात आले आहेत. त्याबाबतचे आदेश नगर विकास विभागाचे सह सचिव पां.जो. जाधव यांनी आज (गुरूवार) काही वेळापुर्वीच दिले आहेत.

राजेंद्र जगताप यांची दि. 29 जून 2017 रोजी प्रतिनियुक्तीने पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली होती. आज त्यांना कार्यमुक्त करण्यात आले असून त्यांना त्यांच्या पदाचा कार्यभार श्रीमती रूबल अगरवाल (अप्पर आयुक्त, पुणे महानगरपालिका,पुणे) यांना देण्यास सांगितले आहे. राजेंद्र जगताप यांच्या पदस्थापनेबाबत स्वतंत्र आदेश काढण्यात येणार आहेत.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like