सावधान ! तुमचा मोबाईल कधीही पडू शकतो बंद, जगभरात वेगाने पसरतोय ‘हा’ व्हायरस

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – टेक्नॉलॉजीच्या विश्वात नवीन संकट आले आहे. Silex नावाचा नवीन मालवेअर म्हणजे व्हायरस जगभरातील IoT डिव्हाइसेवर हल्ला करत आहे. IoT म्हणजे ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’ म्हणजे असे डिव्हाईस ज्यामध्ये सेन्सर असते आणि जे इंटरनेटच्या माध्यमातून एका डिव्हाईसकडून दुसऱ्या डिव्हाइसला डेटा हस्तांतरित करतात. ब्रीकर बोट नावाचा अशाच प्रकारचा व्हायरस २०१७ मध्ये व्हायरल झाला होता. या व्हायरसने BSNL आणि MTNL ला धोका पोहचवला होता. यांमुळे BSNL ब्रॉडबॅंड सब्सक्राइबर्सच्या कमीतकमी ६०,००० मॉडेम वर परिणाम झाला होता. हा व्हायरस या आधीच्या व्हायरसपेक्षा जास्त धोकादायक आहे.

या व्हायरसला १४ वर्षाच्या एका मुलाने बनवले असून याचे कोड नाव Light Leafon असे आहे. या व्हायरसच्या हल्ल्यानंतर स्मार्ट IoT डिव्हाईसचे काम करणे बंद होऊन जाते. Silex व्हायरस नेटवर्क कॉन्फिगरेशनवर देखील परिणाम करतो.

कसा काम करतो हा व्हायरस

या व्हायरसच्या हल्ल्यानंतर युजरला वाटते की हार्डवेअरमध्येच गडबड असेल परंतु असे काहीही नसते. या व्हायरसला तोंड देण्यासाठी युजरच्या फर्मवेयरला मॅनुअली आणि पुन्हा एकदा अनइन्स्टॉल करावे लागेल. हे अनेक युजर्ससाठी कठीण काम आहे. जगभरात हा व्हायरस वेगाने पसरत आहे. या व्हायरसमुळे स्मार्टफोन बंद पडू शकतो.

माझी उत्तराधिकारी महिला असू शकेल, परंतु ती आकर्षक असायला हवी : दलाई लामा

मराठा आरक्षण झाले आता धनगर व मुस्लिम समाजाला आरक्षण हेच ध्येय : सुनिता गडा

व्यायामाचा आनंद वाढविण्यासाठी ही आहे ‘बेस्ट आयडिया’

त्वचेच्या बचावासाठी ‘वॉटर थेरपी’ ठरू शकते लाभदायक