स्मार्ट डॉग करेल अंध व्यक्‍तींना रस्ता ओलांडण्यासाठी मदत अन् दुश्मनांची शिकार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली पोलिसांनी नुकतेच एका खतरनाक ‘डॉग स्क्वॉड’ला ट्रेनींग दिले आहे. या स्कॉड मधील पाच कुत्तरे दिसायला आणि कामाला एकदम शार्प आहेत. या मुक्या प्राण्यांच्या जोरावर दिल्ली पोलीस आता अनेक गुन्हेगारांचा शोध लावणार आहेत.

स्मार्ट डॉग, अंधों को कराएगा सड़क पार, दुश्मनों का करेगा शिकार

नुकतेच डॉग स्कॉडमध्ये भरती झालेले हे पाच कुत्रे जन्मतःच शिकारी स्वभावाचे आहेत. यांचे वयोमान हे बारा ते पंधरा वर्ष इतके आहे. पाण्यात पोहणे हे यांचा फक्त स्वभाव नसून जन्मजात यांना मिळालेली देणगी आहे.

स्मार्ट डॉग, अंधों को कराएगा सड़क पार, दुश्मनों का करेगा शिकार

गोल्डन रिट्रिव्हर मध्ये आंधळ्या व्यक्तींसोबत चालून त्यांना रस्ता पार करून देण्याइतपत क्षमता आहे. हे कुत्रे अतिशय चलाख आणि चपळ देखील आहेत. एखाद्या बोलणाऱ्या माणसाला न करता येणारे काम सुद्धा हे मुके प्राणी सहज करू शकतात.

स्मार्ट डॉग, अंधों को कराएगा सड़क पार, दुश्मनों का करेगा शिकार

तपासणी करणारे आणि वास घेऊन शोध लावण्यामध्ये हे कुत्रे अतिशय तत्पर आहेत. जमीनीच्या आतमध्ये खूप लांबपर्यंतचे वास हे अगदी सहज घेऊ शकतात. यांनी एखादा सुगंध घेतला की ते कधीही त्याला विसरत नाहीत त्यामुळे यांना मानवी जीवनातील जासूसा पेक्षाही उत्तम जासूस समजले जाते. त्यामुळेच कदाचित दिल्ली पोलिसांनी यांच्या राहणीमानासाठी वातानुकूलित घराची व्यवस्था केली आहे.

दिल्ली पोलीस विशेष आयुक्त सतीश गोलच्या यांनी सांगिलते की, आतापर्यंत गोल्डन रिट्रिव्हरची भरती केंदीय औद्योगिक सुरक्षा बल, स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप आणि राष्ट्रीय सुरक्षा गार्डमध्ये करण्यात येत होती. मात्र राज्य पोलिसांमध्ये दिल्ली पोलिसांव्यतिरिक्त अजून कोणी यांची भरती केली की नाही हे सांगणे कठीण आहे.

You might also like