WhatsApp आणि E-Mail व्दारे पाठवता येतील हृदयाचे ठोके, ‘या’ किंमतीला मिळणार स्टेथोस्कोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी एक आगळावेगळा स्टेथोस्कोप बनवला आहे. ज्याच्या माध्यमातून तुम्ही इमेल द्वारे सुद्धा आपली हार्ट बीट पाठवू शकणार आहात. या उपकरणांसाठी इंटरनेट आणि ब्लूटूथची आवश्यकता असते. हे उपकरण हृदयाचे ठोके रेकॉर्ड करू शकते आणि रुग्ण आपल्या डॉक्टरांना ते मेलद्वारे किंवा व्हाट्सअ‍ॅपद्वारे पाठवू शकता.

या स्मार्ट स्टेथोस्कोपला आयु सिंक असे नाव देण्यात आले आहे. या उपकरणाला ग्रामीण भागासाठी बनवण्यात आले आहे. जेणेकरून डॉक्टर पोहचू न शकणाऱ्या भागातील रुग्णांना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होऊ शकेल.

या जागेवर उपयोगात येऊ शकतो स्टेथोस्कोप
ग्रामीण भागातील रुग्णांना या उपककरणाचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. हृदयाचा त्रास असलेले रुग्ण यावरून आपली हार्ड बिट रेकॉर्ड करून सजतेने डॉक्टरांपर्यंत पोहचवू शकतात. बाकी स्टेथोस्कोपच्या मानाने हे उपकरण 35 % अधिक चांगले आहे.

स्मार्ट स्टेथोस्कोपची किंमत किती ?
या टेथस्कोपने ईएमआईईएमसीच्या माध्यमातून टेस्ट पास केली आहे. विद्यार्थ्यांनी या उपकरणामध्ये मोठी बॅटरी देखील दिलेली आहे जिची 18 तासांपर्यंत काम करण्याची क्षमता आहे. या उपकरणाची किंमत 14 हजार रुपये इतकी आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाने केवळ 100 असे टेथस्कोप बनवले आहेत ज्यांना तीन वेगवेगळ्या ग्रामीण भागात पाठवण्यात येणार आहे.

Visit : Policenama.com