नव्या वर्षात जिओ यूजर्सना करणार आणखी ‘स्मार्ट’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन- स्वस्तात इंटरनेट सुविधा देऊन टेलिकॉम क्षेत्रात धुमाकूळ घातलेल्या रिलायन्स जिओ(Reliance Jio) आता आणखी एक पाऊल पुढे टाकत ग्राहकांसाठी आकर्षक भेट घेऊन येणार आहे. आता रिलायन्स जिओ मोठ्या स्क्रीनचा स्वस्त स्मार्टफोन बाजारात आणण्याच्या तयारीमध्ये आहे.

यासाठी  रिलायंस जिओ पार्टनर्ससोबत एकत्र येऊन जोमाने काम करत आहे. सध्या अशी काही लोकं आहेत ज्यांना, फिचर फोनकडून 4G स्मार्टफोनमध्ये अपग्रेड होण्याची इच्छा आहे. त्या ग्राहकांना टार्गेट करूने हा रिलायन्स जिओचा मानस आहे. असे कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले.

रिलायन्स जिओचे सुनील दत्त यांनी एका प्रसिद्ध वृत्तपत्राला माहिती देतांना सांगितले आहे की, आम्ही आमच्या पार्टनर असलेल्या कंपन्यांसोबत एकत्र येऊन काम करण्याचा प्रयत्न करण्याच्या विचारात आहोत.आणि या कामाचा फायदा नक्कीच एका सर्वात मोठ्या समुदायाला होणार असून त्यामुळे त्यांना लार्ज स्क्रिन असणाऱ्या स्वस्त स्मार्टफोन खरेदी करणं शक्य होणार आहे. आगामी काळात जिओ काही महिन्यांच्या अंतराने कोणती ना कोणती  नवीन योजना घेऊन येणार असल्याचेही सांगितले.