Smart TV खरेदी करायचाय ? तर आत्ताच करा, कारण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही Smart TV खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण आता पुढील महिन्यात तुम्हाला हीच Smart TV महाग मिळू शकणार आहे. 1 एप्रिल 2021 पासून स्मार्टटीव्ही महाग होणार आहे. सुमारे 2,000 ते 3,000 रुपयांपर्यंत वाढ होऊ शकणार आहे.

देशात मोठ्या प्रमाणात Smart TV चा वापर वाढला आहे. तर गेल्या 8 महिन्यांमध्ये टीव्हीच्या किमतीत सुमारे 300 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यादरम्यान स्मार्ट टीव्हीच्या किमती 3,000 ते 4,000 रुपयांनी वाढल्या आहेत. आता पुढील महिन्यात स्मार्ट टीव्हीच्या किमतीत 2,000 ते 3,000 रुपये वाढणार आहे. टीव्हीच्या किमतीत 300 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामध्ये आता 5 टक्के अतिरिक्त वाढ केल्याने Smart TV ची मागणी कमी होऊ शकते.

दरम्यान, गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या कालावधीत लोक घरात होते. त्यामुळे अनेक घरांमध्ये स्मार्ट टीव्हीची गरज भासू लागली होती. लॉकडाऊनच्या काही महिन्यानंतर टीव्हीच्या मागणीत तेजी पाहिला मिळाली. जसे सरकारने निर्बंध कमी केले. त्यानंतर टीव्हीच्या विक्रीत वाढ झाली आहे. याशिवाय सरकारने दिशा-निर्देशच्या आधारे ई-कॉमर्सवरूनही स्मार्ट टीव्हीची मागणी वाढली आहे.