×
Homeटेक्नोलाॅजीSmart Watch | हे स्मार्टवॉच सांगणार तुम्ही किती दारू प्यायलात, Apple वॉचसारखे...

Smart Watch | हे स्मार्टवॉच सांगणार तुम्ही किती दारू प्यायलात, Apple वॉचसारखे दिसते; खुप काही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Smart Watch | मार्केटमध्ये असे स्मार्टवॉच येत आहे जे सांगेल एखाद्या व्यक्तीने किती दारू प्यायली आहे. BYD स्मार्टवॉचच्या पेटंटला मान्यता मिळाल्याचे वृत्त चिनी माध्यमांमध्ये येत आहे. यास स्मार्टवॉचच्या विकासातील हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. बीआयडी स्मार्टवॉच पेटंटच्या डिझाईनवरून दिसते की ते अनेक हेल्थ सेन्सर्ससह येईल. याशिवाय समोरच्या व्यक्तीने किती दारू प्यायली आहे हे देखील वॉचवरून समजू शकते. या घड्याळात हृदयगती, शरीराचे तापमान, ब्लड ऑक्सिजन आणि रक्तदाबाचे निरीक्षण यांचाही समावेश आहे. (Smart Watch)

 

२०२१ मध्ये होणार होते लॉन्च
BYD स्मार्टवॉच २०२१ मध्ये लॉन्च होईल अशी अफवा होती. यामध्ये कार अनलॉक करणे, स्मार्ट इग्निशन आणि सोयीस्कर एंट्री तसेच कारचे टेलगेट उघडणे यांचा समावेश होता. पण घड्याळ आले नाही आणि BYD काहीच बोलले नाही. एका नवीन पेटंटमध्ये डिझाईनचा सुद्धा समावेश आहे. घड्याळ सामान्य दिसत आहे. ते अगदी अ‍ॅपल वॉचसारखे दिसत आहे. या स्मार्टवॉचला अनेक सेवा देण्यासाठी कार अ‍ॅप्सशी जोडले जाऊ शकते. (Smart Watch)

कधी लॉन्च होणार माहित नाही
अल्कोहोल डिटेक्शन BYD स्मार्टवॉचच्या लाँच तारखेबद्दल अद्याप माहिती नाही. हे स्मार्टवॉच कारशी सुसंगत असू शकते. हे वॉच येताच इतर कंपन्यांची धावपळ उडू शकते. याला टक्कर देण्यासाठी त्या कंपन्या असेच स्मार्टवॉच बाजारात आणू शकतात.

 

या वॉचला पेटंट मिळाल्याने स्पष्ट होते की बीवायडी स्मार्टवॉच लवकरच बाजारात येऊ शकते.
घड्याळात येणार्‍या नवीन तंत्रज्ञानाबद्दल सर्वाधिक चर्चेत अल्कोहोल शोधण्याचे कार्य आहे.
मद्य सेवनाचे प्रमाण मोजण्यासाठी बाजारात विविध उपकरणे उपलब्ध आहेत.
काही सेन्सरसह येतात आणि काहींमध्ये ब्लोपाईप फिचर असते.

 

Web Title :- Smart Watch | this smartwatch will tell you how much alcohol youve had looks similar to the apple

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Satyajit Tambe | ‘मी काँग्रेसचाच उमेदवार’, सत्यजीत ताबेंनी सांगितलं अर्ज भरण्यामागचं कारण

Usman Khawaja | ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ फलंदाजाच्या शॉटचा Video व्हायरल; “सूर्यकुमारची स्टाईल मारायला गेला आणि…!”

Kili Paul | प्रसिद्ध रील स्टार किली पॉलला ही रितेश देशमुखच्या ‘वेड लावलंय’ गाण्याची पडली भुरळ, Video केला शेअर

Must Read
Related News