Smartphone Battery | जेव्हा बॅटरी 10% होईल किंवा 20% किंवा 30%… कोणत्या वेळी फोन चार्जिंगला लावणे योग्य?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Smartphone Battery | मोबाईल आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. मोबाईलशिवाय जीवनाची कल्पना करणे कठीण आहे, कारण आता लोक त्यांच्या मोबाईलवरून अनेक गोष्टी करू लागले आहेत. यामध्ये कॉलिंग, मेसेजिंग, शॉपिंग, पेमेंट करणे आणि तिकीट बुक करणे इत्यादींचा समावेश आहे. तुम्ही स्मार्टफोन इतका वापरता, पण तुम्ही कधी त्याच्या लाईफचा विचार केला आहे का? यासाठी तो योग्य पद्धतीने चार्ज करण्याबाबत विचार केला आहे का? नसेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. स्मार्टफोनचे लाइफ आणि बॅटरीशी संबंधित माहिती जाणून घेवूया. (Smartphone Battery)

 

फोन चार्ज करण्याची पद्धत
स्मार्टफोनची बॅटरी कधी चार्ज करावी हे खुप महत्वाचे आहे. जर तुम्ही दिवसभर फोन वापरत असाल तर तो पूर्ण चार्ज ठेवावाच असे नाही. फोन योग्यरित्या चार्ज करण्याचा एक मार्ग देखील आहे. जर तुम्ही फोन योग्य प्रकारे चार्ज केला तर फोनची बॅटरी चांगली राहते. या पद्धतीबद्दल जाणून घेऊया. (Smartphone Battery)

 

फोन किती चार्ज करावा?
अनेकांना असे वाटते की ते फोन १००% पूर्ण चार्ज करतात आणि नंतर आरामात वापरतात. यामुळे बॅटरी जास्त काळ टिकेल, पण तसे नाही. केवळ ८०-९० टक्के फोन चार्ज करावा, असे तज्ञांचे मत आहे. पूर्ण बॅटरी चार्ज करणे स्मार्टफोनच्या आयुष्यासाठी चांगले नाही. त्यामुळे फोन १०० टक्के चार्ज करू नका.

फोन कधी चार्ज करावा?
काही लोक फोन पूर्णपणे डिस्चार्ज झाल्यानंतर चार्ज करतात. जर तुम्ही देखील अशा लोकांमध्ये असाल तर हे जाणून घ्या की असे करू नये. फोन २०% असेल तेव्हाच चार्जिंगवर ठेवावा. असे मानले जाते की बॅटरी २० ते ८० टक्क्यांपर्यंत ठेवणे फोनसाठी चांगले आहे.

 

Web Title :- Smartphone Battery | when and how much should the smartphone battery be charged

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Solapur Police | कर्तव्य सोडून पोलिसाचा भरचौकात डान्स, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस कर्मचारी ताब्यात

Tunisha Sharma Death | तुनिषा शर्माच्या पोस्टमॉर्टममध्ये मोठा खुलासा; मृत्यूचे कारण आले समोर

MP Sanjay Raut | ‘… त्या दिवशी संजय राऊत हे शरद पवारांच्या मांडीवर बसलेले दिसतील’, शिंदे गटाच्या आमदाराचा टोला