SmartPhone खरेदी करताना चुकूनही करू नका ‘या’ चुका ! ‘अशी’ घ्या काळजी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – स्मार्टफोन घेताना नक्की कोणत्या गोष्टी तपासून घ्याव्यात हे अनेकांना कळत नाही. कधीही स्मार्टफोन खरेदी करताना रिसर्च आणि प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. असं न केल्यास तोटा होऊ शकतो. फोनचा डिस्प्ले, कॅमेरा आणि बॅटरी चांगली असणं गरजेचं आहे. जर खोलात जाऊन रिसर्च करणं तुम्हाला शक्य नसेल तर काय चुका टाळायला हव्यात हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आज याचबद्दल आपण माहिती घेणार आहोत.

1) अधिक खर्च करू नका – दमदार फीचर्स असणाारा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी जास्त पैसे खरेदी करण्याची आवश्यकता नाही. जो अनुभव आपल्याला प्रीमियम डिव्हाईसमध्ये मिळतो तेच फीचर्स तुम्हाला मिडरेंज सेगमेंटमध्येही मिळतात. किंमतीपेक्षा गरजेनुसार फोनची निवड करणं कधीही चांगलं.

2) खरेदी करा लेटेस्ट मॉडेल – स्मार्टफोनचं मार्कटे हे नेहमी बदलत असतं. त्यामुळं बाजारात सतत नवीन फोन लाँच होत असतात. अशातच तुम्ही स्मार्टफोन खरेदी करताना मार्केटमध्ये जो नवीन आणि लेटेस्ट फोन असेल त्यावर रिसर्च करून तो खरेदी करा.

3) प्रीमियम ब्रँड – स्मार्टफोन खरेदी करताना ॲप्पल आणि सॅमसंग सारख्या प्रीमियम ब्रँडचं नाव समोर येतं. मात्र याच ब्रँडचे स्मार्टफोन विकत घेणं आवश्यक नाही. कारण अनेक कंपन्या अशा आहेत ज्या कमी किंमतीत तेच फीर्चर्स असलेले स्मार्टफोन विक्री करतात. तुम्हाला ज्या ब्रँडवर विश्वास आहे असाच स्मार्टफोन खरेदी करा.