Smartphone Dangerous App | तुमच्या स्मार्टफोनमध्ये आहे का हे धोकादायक अ‍ॅप! तुमचे अकाऊंट करू शकते रिकामे, तात्काळ करा डिलिट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Smartphone Dangerous App | जर तुम्ही अँड्रॉईड स्मार्टफोन यूजर आहात तर तुम्ही सतर्क होण्याची आवश्यकता आहे. कारण सध्याच्या डिजिटल काळात मालवेयर आणि व्हायरसच्या माध्यमातून हॅकर्स डाटा चोरी करत आहेत. यामुळे तुमची खासगी माहिती सुद्धा त्यांच्यापर्यंत जाते, ज्यामुळे तुमचे अकाऊंट सुद्धा रिकामे होऊ शकते. (Smartphone Dangerous App)

 

सुरक्षेचा विचार करता Google Play Store वरून व्हायरस पाठवणारे आणि डाटा चोरी करण्यारे अ‍ॅप बॅन केले जातात. याच पार्श्वभूमीवर जोकर नावाचा मालवेयर पाठवणारे अ‍ॅप बॅन करण्यात आले आहे. जे गुगल प्ले स्टोअरवरून 5 लाख वेळा डाऊनलोड करण्यात आले आहे.

 

1 वर्षापासून होते हे अ‍ॅप
जोकर मालवेयर (joker malware apps) पहिल्यांदा 2017 मध्ये आढळून आला होता, हा सायबर गुन्हगारांनी (Cyber Criminals) बनवला होता. हा व्हायरस काही वर्षापूर्वी गुगलने घालवला, परंतु वर्षापासून एका अ‍ॅपमध्ये तो कायम होता. जे 16 डिसेंबरला बंद केले आहे. (Smartphone Dangerous App)

 

अशी होत आहे फसवणूक
सुरक्षा फर्म जोकर मालवेयर फ्लीसवेयरच्या रूपात क्लासिफाईड केले आहे.
याचे प्राथमिक काम यूजाला नको असलेले पेमेंटच्या प्रीमियम सेवांची सदस्यता घेण्यासाठी फसवण्यासाठी क्लिक करणे आणि एसएमएस कॅप्चर करणे आहे.

मात्र, Google Play Store ने अ‍ॅप स्टोअरवरून हटवले आहे.
परंतु हे अ‍ॅप अजूनही त्या यूजरसाठी चिंतेचा विषय आहे ज्यांनी अगोदरपासून डाऊनलोड केले होते.

 

काय करायला हवे?
जर तुम्ही त्या 5 लाख लोकांपैकी आहात ज्यांनी जोकर संक्रमित कलर मेसेज अ‍ॅप डाऊनलोड केले आहे,
तर ते ताबडतोब डिलिट करा. हे अ‍ॅप फोनमधून अनइस्टॉल करण्यासोबतच याची फाईल सुद्धा गुगल प्ले स्टोअरच्या गेम अँड अ‍ॅप सेक्शनमध्ये जाऊन हटवू शकता.

 

या अ‍ॅपपासून सुरक्षेसाठी काय करावे
यासाठी Google Play Store उघडा आणि मेनूमध्ये सबस्क्रीप्शन ऑपशनमध्ये जा.
त्या सर्व प्रीमियम सदस्यतेची तपासणी करा ज्यांच्यासाठी तुम्ही साइन-अप केले आहे,
आणि जर त्यापैकी कोणतेही संशयीत वाटले तर ते निवडा आणि आणि सदस्यत्व रद्द करा,
नंतर ऑन-स्क्रीन निर्देशांचे पालन करा. ज्यानंतर नुकसानीपासून सुरक्षित व्हाल.

 

Web Title :- Smartphone Dangerous App | is this dangerous app somewhere in your smartphone your account can be empty delete it immediately

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

WhatsApp वर निवडलेल्या कॉन्टॅक्टपासून सुद्धा लपवू शकता Last Seen, प्रोफाईल फोटो आणि स्टेटस

Monalisa Bold Photos | मोनालिसा शॉर्ट्समधील बोल्ड अंदाजानं झाली सोशल मीडियावर ट्रोल.. नेटकऱ्यांनी दिल्या चांगल्याच शिव्या

 

Nikki Tamboli | लवकरच निक्की तांबोळी करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण, झळकणार मोठ्या पडद्यावर