Smartphone | जर फोनमध्ये ‘हे’ 10 बदल दिसले तर समजा हॅक झालाय तुमचा स्मार्टफोन ! ‘या’ पद्धतीने तपासा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Smartphone | पेगासस स्कँडलने पुन्हा एकदा मोबाइल हेरगिरीचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. मात्र, सामान्य इंटरनेट यूजर्सला पेगासस सारख्या स्पाय टूलला घाबरण्याची आवश्यकता नाही, परंतु इतर हॅकिंग आणि स्पाय सॉप्टवेयरपासून सावध राहण्याची गरज आहे. आम्ही 10 अशा हालचाली सांगणार आहोत ज्यावरून तुम्हाला स्पाय टूल्स आणि अ‍ॅपबाबत समजू शकते.

1- बॅटरी सामान्यपेक्षा जास्त वेगाने संपणे
जर फोनची बॅटरी सामान्यपेक्षा जास्त वेगाने संपत असेल तर शक्यता आहे की तुमच्या फोनमध्ये स्पाय अ‍ॅप किंवा टूल असू शकते. यासाठी अगोदर फोनच्या बँकग्राऊंडला सुरू असलेले अ‍ॅप तपासा. ते बंद करा आणि मॉनिटर करा.

2- असे अ‍ॅप दिसणे जे तुम्ही डाऊनलोड केले नव्हते
तुमच्या फोनमधील असे अ‍ॅप्स ओळखा जे तुम्ही डाऊनलोड केले नसूनही आहेत. असे अ‍ॅप हॅकर्सद्वारे फोनमध्ये डाऊनलोड केले जाऊ शकतात. ते डिलिट करा.

 

3- जेव्हा फोन मंदावतो

जर फोन मंद चालत असेल आणि थांबून-थांबून काम करत असेल तर फोनच्या बॅकग्राऊंडमध्ये स्टील्थ मालवेयर असे शकतो.

4- मोबाइल डेटाचा वापर जास्त होणे
जर डेटाचा वापर अचानक वाढला किंवा सामान्यपेक्षा जास्त होत असेल तर फोनमध्ये स्पाय अ‍ॅप्स किंवा सॉप्टवेयर मोबाइल डेटाचा वापर करत आहे कारण ते इंटरनेटचा वापर करून तुमच्या हालचाली ट्रॅक करतात.

5- फोन विचित्र प्रकारे काम करत असेल
तुमचा स्मार्टफोन (Smartphone) विचित्र काम करत आहे का? अ‍ॅप्स आपोआप क्रॅश होतात किंवा लोड होण्यास अडचण येते का? अनेक साईट सामान्यपेक्षा वेगळ्या दिसतात का? हा एक संकेत आहे की फोनमध्ये स्पाय अ‍ॅप काम करत आहे.

6- प्रत्येक ठिकाणी विचित्र पॉप-अप
स्क्रीनवर खुप जास्त पॉप-अप दिसत असतील, तर हे अ‍ॅडवेयरमुळे होऊ शकते. हे एक प्रकारचे सॉप्टवेयर आहे जे डिव्हाइसला जाहिरातीने भरते. अशा लिंकवर कधीही क्लिक करू नका.

7- असे फोटो आणि व्हिडिओ जे कधी घेतलेच नाहीत
तुमच्या फोटो गॅलरीत असे फोटो आणि व्हिडिओ आहेत जे तुम्ही घेतलेच नाही, तर सावध व्हा, कारण यावरून समजते की, तुमच्या कॅमेर्‍यावर कुणाचे तरी नियंत्रण असू शकते.

8- फ्लॅश लायटिंग ऑन
जेव्हा तुम्ही तुमच्या फोनचा वापर करत नसता, तेव्हा सुद्धा फ्लॅश लाईट ऑन राहाते का, हा एक संकेत आहे. असे होत असेल तर एखादी व्यक्ती तुमच्या डिव्हाईसला पूर्णपणे नियंत्रित करत आहे.

 

9- तुमचा फोन गरम होतो

बराच वेळ वापरल्याने फोन गरम होऊ शकतो.
परंतु जर तुमचा फोन वापर न करताच गरम होत असेल तर शक्यता आहे की हॅकर्स आपले काम करत आहे.

10- तुम्ही न केेलेल्या मेसेज किंवा कॉल्सचे लॉग दिसणे
जर कॉल किंवा मेसेज लॉगमध्ये तुम्ही काही अशी माहिती दिसत असेल,
जी तुम्ही कुणाला पाठवलीच नव्हती. तर हा या गोष्टीचा संकेत असू शकतो की,
हॅकर्स तुमच्या फोनचा वापर करत आहे.

Web Title :- Smartphone | if you have seen these 10 things in your phone so that means your phone is hacked or spy how to know phone hack pegasus

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Supreme Court | महाराष्ट्र सरकारला उपचाराचे दर ठरवण्याचा अधिकार नाही

‘या’ पद्धतीने आणि नाण्यांच्या बदल्यात मिळताहेत 1900 रुपयांपासून 1.5 लाख, तुमच्याकडे असतील तर ताबडतोब करा ‘हे’ काम

Earthquake | काही तासात देशात 5 ठिकाणी भुकंपाचे धक्के; बिकानेर, मेघालय तीव्र धक्क्याने हादरला