Smartphone | जर तुमची मुले सुद्धा जास्त मोबाइल पहात असतील तर ‘या’ 6 टिप्सचा करा वापर, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्मार्टफोनचा (smartphone) अतिवापर मुलांसाठी खुप धोकादायक ठरू शकतो. जर तुमच्या मुलांना सुद्धा ही सवय असेल आणि ती बदलायची असेल तर यासाठी काही पद्धती आपण जाणून घेणार आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्ही सहजपणे मुलांना फोनपासून (smartphone) दूर ठेवू शकता.

1. आऊटडोअर गेम –
मुलांना बाहेर खेळण्यासाठी पाठवा. त्यांची ही सवय सोडवण्यासाठी त्यांना रोज गार्डनमध्ये घेऊन जाऊ शकता.

2. मोबाईलपासून ठेवा दूर –
मुलांना फोन वापरण्याचे एक टाइम टेबल बनवा यामुळे ते ठरलेल्या वेळात फोन पाहतील. मुलांना खाताना, अभ्यास करताना फोन देऊ नका.

3. पासवर्डचा वापर –
तुमच्या पश्चात मुलांनी फोनचा वापर करूनये म्हणून फोनमध्ये पासवर्ड लावा.

4. निसर्ग प्रेम –
निसर्ग सर्वांसाठी एक नॅचरल थेरेपीचे काम करतो. यासाठी तुम्ही घरातच गार्डन बनवू शकता, ज्यामध्ये मुले मजा करू शकतील.

5. इनडोअर गेम –
तुम्ही मुलांसोबत घरातील बोर्ड गेम खेळा किंवा कुकिंग किंवा बागकाम करा.

6. मुलांना वेळ द्या –
मुलांनी फोनचा वापर करू नये असे वाटत असेल तर त्यांना त्याचे फायदे आणि तोटे समजवा. त्यांना वेळ द्या आणि त्यांच्यासोबत बोला.

Web Titel :- Smartphone | if your children also watch more mobile then use these tips

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis । नाना पटोलेंच्या स्वबळाच्या घोषणेनं शिवसेना-राष्ट्रवादीला कापरं भरलं, अन्…

Maharashtra Police Recruitment | राज्यात डिसेंबर 2021 पर्यंत 5200 पोलिसांची भरती, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांची घोषणा (व्हिडिओ)

SSB HC Recruitment 2021 | तरुणांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! हेड कॉन्स्टेबलच्या 115 जागांसाठी भरती