×
Homeटेक्नोलाॅजीSmartphone Listens Your Personal Things | स्मार्टफोन ऐकतात तुमच्या पर्सनल गोष्टी! ताबडतोब...

Smartphone Listens Your Personal Things | स्मार्टफोन ऐकतात तुमच्या पर्सनल गोष्टी! ताबडतोब ऑफ करा ही सेटिंग, अन्यथा सापडू शकता मोठ्या संकटात

नवी दिल्ली : तंत्रज्ञानाच्या (Technology) या युगात बहुतांश लोक स्मार्ट डिव्हाईसेस (Smart Devices) चा वापरत आहेत. एकीकडे तंत्रज्ञानाने आपले जीवन सुसह्य करत आहे, तर दुसरीकडे त्याचे काही दुष्परिणामही (Side Effects Of Smart Devices) समोर येत आहेत. आजकाल जवळपास प्रत्येकजण स्मार्टफोन (Smartphone) वापरतो. स्मार्टफोनमध्ये आपण अनेक प्रकारचे अ‍ॅप वापरतो. हे अ‍ॅप्स (Apps) आपल्याकडून अनेक परमिशन (Permissions) मागतात आणि आपण विचार न करता त्यांना सर्व परवानग्या देतो. कॅमर्‍यापासून माईक (Camera to Mic) पर्यंत परवानग्या देताना, आपण विचार करत नाही की डिव्हाईस त्याचा वापर कधी आणि किती वेळा करेल (Smartphone Listens Your Personal Things).

स्मार्टफोन ऐकतो आपल्या वैयक्तिक गोष्टी!
गुगल व्हॉईस असिस्टंटसाठी मायक्रोफोनची परमिशन द्यावी लागते. याद्वारे गुगल आपल्या कमांड ऐकून काम करते. अशाच प्रकारे स्मार्टफोनमध्ये व्हॉइस-टू-स्पीच फीचर आपण वापरतो तेव्हा मायक्रोफोनची परमिशन द्यावी लागते. परंतु व्हॉईस कमांडवर काम करणाऱ्या डिव्हाईसमध्ये मोठी समस्या असते. हे डिव्हाईस मायक्रोफोनचा वापर आपले बोलणे ऐकण्यासाठी करतात. जसे की अलेक्सा तेव्हाच काम करते जेव्हा तुम्ही तिला तिचे नाव घेऊन कमांड देता. याचा अर्थ असा आहे की डिव्हाईस आपले सर्व बोलणे ऐकत असतो.

फेसबुकही मागते मायक्रोफोनची परवानगी
अनेक वेळा फेसबुक यूजर्सकडे मायक्रोफोनचा अ‍ॅक्सेस मागते. ते व्हिडिओ चॅटिंग आणि टेक्स्ट टू स्पीचसाठी मायक्रोफोनचा अ‍ॅक्सेस मागते. मात्र, त्याला परवानगी देण्यापूर्वी, आम्ही कधीही विचार करत नाही की ते आपल्या पर्सनल गोष्टी ऐकू शकते.

अशी बंद करा मायक्रोफोनची परमिशन
जर तुम्ही अँड्रॉइड डिव्हाईस वापरत असाल तर प्रथम फोनच्या सेटिंग्जमध्ये जा. येथे तुम्हाला सिक्युरिटी अँड प्रायव्हसीच्या ऑपशनवर जावे लागेल. येथे क्लिक केल्यावर प्रायव्हसीचा पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करा. येथे मायक्रोफोन, कॅमेरा आणि इतर सेन्सर्सचे तपशील मिळतील. येथून तुम्हाला समजू शकते की कोणत्या अ‍ॅपला कोणती परमिशन दिली आहे. तसेच तुम्ही कोणत्याही अ‍ॅपसाठी मायक्रोफोन किंवा इतर कोणत्याही सेन्सरची परवानगी ब्लॉक किंवा रिमूव्ह करू शकता. (Smartphone Listens Your Personal Things)

व्हॉईस असिस्टंटसाठी
एका संशोधनात असे आढळून आले आहे की स्मार्ट स्पीकर देखील तुमची वैयक्तिक माहिती लीक करू शकतात. अशावेळी जर तुम्ही स्मार्ट स्पीकर वापरत असाल तर तुम्हाला अ‍ॅमेझॉन इको डिव्हाइसवर मायक्रोफोनसारखे बटण दिसेल. त्यावर क्लिक करून तुम्ही मायक्रोफोन बंद करू शकता. दुसरीकडे, गुगल असिस्टंटसाठी, तुमच्या फोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन वर नमूद केलेल्या स्टेपची पुनरावृत्ती करावी लागेल.

iOS यूजर्ससाठी
जर तुम्ही आयफोन वापरत असाल तर तुम्हाला सेटिंगमध्ये जाऊन अ‍ॅपची परमिशन रिमूव्ह करावी लागेल.
येथे ज्या अ‍ॅपची परमिशन काढायची आहे त्यावर क्लिक करावे लागेल.
अ‍ॅपवर क्लिक केल्यानंतर, मायक्रोफोनचा टॉगल ऑफ करावा लागेल.
तुम्ही सेटिंग्जमध्ये जाऊन थेट सिक्युरिटी अँड प्रायव्हसीमध्ये देखील जाऊ शकता.
येथे तुम्हाला मायक्रोफोनचे लेबल दिसेल. येथून तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या कोणत्याही अ‍ॅपच्या परमिशन रिमूव्ह करू शकता.

Web Title :- Smartphone Listens Your Personal Things | is smartphone listening your personal talk know how to stop it

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PAK vs NZ 1st Test | बाबर आझमने रचला इतिहास; युसूफचा 16 वर्षांपूर्वीचा ‘तो’ विक्रम मोडला

Manushi Chhillar | ख्रिसमस स्पेशल लुकमध्ये मानुषी दिसतीय एकदम कडक; प्रेक्षक करत आहेत कौतुक

 

Must Read
Related News