अवघ्या 25 मिनिटात यूरिन ‘इन्फेक्शन’ची टेस्ट करून ‘रिपोर्ट’ देणारा स्मार्टफोन, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रूग्णाला यूरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजेच यूटीआय आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी ऑफ बाथचे बायॉलॉजिकलच्या इंजिनिअर्सनी एक खास प्रकारचा स्मार्टफोन तयार केला आहे. ज्याद्वारे २५ मिनिटात डॉक्टरांना यूटीआय आहे की नाही हे कळणार आहे. तसेच या स्मार्टफोनच्या मदतीने डॉक्टरांना रिपोर्टची वाट पाहत बसावं लागणार नाही, त्यांना रूग्णावर लगेच उपचार करता येतील.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, यूरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनच्या ८०० टक्के केसेसमध्ये E.coli बॅक्टेरिया जबाबदार असतो. तसेच यूटीआयच्या अनेक केसेसमध्ये टेस्टची कमतरता आणि आजूबाजूला लॅबची व्यवस्थित व्यवस्था नसल्याने अनेक रूग्णांना अनावश्यक अ‍ॅंटी-बायोटिक्सचं सेवन करावं लागतं. ज्याने त्यांची अडचण दूर होण्याऐवजी यूटीआय इन्फेक्शन वाढवणारे बॅक्टेरिया अधिक वाढवतात. याने रूग्णावरील उपचार त्रासदायक आणि जास्त वेळ चालू शकतो. त्यामुळे या स्मार्टफोनच्या मदतीने ही संबंधित टेस्ट सोपी आणि पोर्टेबल होणार आहे. त्यामुळे प्रायमरी हेल्थ केअर आणि टेस्ट्समध्ये या फोनचा वापर विकसनशिल देशांमध्ये फार महत्वाची भूमिका बजावू शकेल अशी आशा आम्ही व्यक्त करतो. दरम्यान, हा स्मार्टफोनवर करण्यात आलेल्या रिसर्च बायोसेंसर्स आणि बायोइलेक्ट्रॉनिक्समध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.

या स्मार्टफोनच्या माध्यमातून यूटीआय इन्फेक्शनची माहिती मिळवण्यासाठी प्रेग्नन्सी टेस्टप्रमाणे यूरिन एका स्ट्राइपमध्ये घेऊन टेस्ट केली जाईल. यूरिनचं सॅम्पल आपल्या हाय सेंसर्स आणि कॅमेराच्या माध्यमातून स्मार्टफोन यूरिन सॅम्पलमधील ई-कॉली बॅक्टेरियाची ओळख पटवेल. त्यांनतर २५ मिनिटांच्या आत तुम्हाला रिपोर्ट मिळेल. ज्यामुळे रूग्णावर वेळेवर उपचार होऊ शकतील. हा स्मार्टफोन क्लिनिकल टेस्टसाठी तयार आहे आणि त्यानंतर हा फोन लवकरच बाजारात उपलब्ध करून दिला जाणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/