SmartPhone Safe Tips | स्मार्टफोन असा ठेवा सुरक्षित ! ऑनलाइन फसवणूक, मालवेयर आणि व्हायरसपासून कसा करावा बचाव? डेटा कसा ठेवावा सुरक्षित? जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  SmartPhone Safe Tips | डिजिटल युगात स्मार्टफोनची गरज जवळपास सर्वांनाच आहे. स्मार्टफोनमुळे अनेक कामे सोपी झाली आहेत. अनेक महत्वाच्या गोष्टी आपण स्मार्टफोनमध्ये सेव्ह करतो. परंतु, आपल्या काही चुकांमुळे स्मार्टफोन सुरक्षित राहात नाही. स्मार्टफोन ऑनलाइन फसवणूक, मालवेयर आणि व्हायरसपासून वाचवणे आवश्यक आहे. या सर्वापासून वाचण्यासाठी आणि फोन सुरक्षित ठेवण्यासाठी काही स्टेप्स (SmartPhone Safe Tips) जाणून घेवूयात.

 

पासवर्ड सेव्ह करून ठेवू नका

 

स्मार्टफोनमध्ये प्रत्येक अकाऊंटचा वेगवेगळा पासवर्ड असतो. पासवर्ड विसरून जाऊ नये यासाठी अनेकजण तो फोनमध्ये सेव्ह करतात.
ज्यामुळे एखाद्यावेळी मालवेयर आल्यास तुमचा पासवर्ड आणि यूजर आयडी थर्ड पार्टीकडे जाऊ शकतो. यासाठी पासवर्ड फोनमध्ये सेव्ह करू नका. (SmartPhone Safe Tips)

 

प्रतिबंधीत अ‍ॅप डाऊनलोड करू नका

 

फोन सुरक्षित ठेवण्यासाठी कोणतेही प्रतिबंधीत अ‍ॅप डाऊनलोड करू नका.
फोन सेटिंगमध्ये जाऊन UNKNOWN सोर्सला परवानगी देणारे ऑपशन बंद करू शकता.
गुगल प्ले स्टोअर, अ‍ॅप्पल स्टोअरवरून अ‍ॅप्स डाऊनलोड करू शकता.

 

VPN चा वापर करा

 

जर तुम्हाला ios सिक्युरिटी पाहिजे असेल तर VPN चा वापर करा.
व्हीपीएन अँड्राईड यूजर्सला चांगली सुरक्षा देऊ शकतात. इंटरनेटवर अनेक VPN असतात.
चांगल्या व्हीपीएनचा वापर करा कारण चुकीच्या व्हीपीएनमुळे स्मार्टफोन आणखी हॅक होऊ शकतो.

 

परमिशन मागणारे अ‍ॅप्स

 

अनेकदा परमिशन मागणार्‍या अ‍ॅप्सचा वापर केला जातो.
ज्यामध्ये अ‍ॅप इन्स्टॉल केल्यास अनेक परमिशन घेतल्या जातात.
ज्याची कोणतीही आवश्यकता नसते. असे अ‍ॅप इन्स्टॉल करू नका.

 

Backup करणे आवश्यक

 

third party कुणीही असो, गुगल स्टोअरवर सुद्धा असेल तरी त्यावर बॅकअप करू नये.
बॅकअप केवळ Google drive, Hard disk, local storage वरच करा. Open Source wifi वर कनेक्ट करू नका. यामुळे फोन सहज हॅक होतो.
जर wifi आणि bluetooth चा वापर करत नसाल तर ते बंद ठेवा.

 

Web Title : SmartPhone Safe Tips | smartphone safe tips how to avoid malware and viruses in the age of online fraud and keep data safe

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

LIC Policy | जर मोबाइलवर पाहिजे असेल LIC पॉलिसीसंबंधी माहिती, तर अशाप्रकारे अपडेट करा संपर्काची माहिती

PM Kisan | आता शेतकर्‍यांना 2000 रु.च्या हप्त्यासोबत मिळेल 3000 रुपयांची गॅरेंटेड मासिक Pension, ‘ही’ आहे प्रोसेस

Legislative Council elections | विधानपरिषदेसाठी शौमिका महाडिक यांचं नांव निश्‍चित? चंद्रकांत पाटील करणार घोषणा