Smartphone | अवघ्या एक सेकंदात फुल चार्ज होईल फोन, ही कंपनी करत आहे काम, सांगितले कसे असेल फ्यूचर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Smartphone | एखादा स्मार्टफोन चार्ज होण्यासाठी किती वेळ लागेल? असे अनेक फोन बाजारात आले आहेत, जे 5 मिनिटांच्या चार्जवर 5 तास चालतात. हा हँडसेट फुल चार्ज होण्यासाठी अर्धा तास लागतो. त्याच वेळी, अशा काही टेक्नोलॉजीवर काम सुरू आहे, जी फक्त एका सेकंदात तुमचा फोन फुल चार्ज करू शकते. (Smartphone)

 

Oppo च्या चार्जिंग टेक्नॉलॉजीचे हेड म्हणाले, भविष्यात आमचे स्मार्टफोन फक्त एका सेकंदात चार्ज होऊ शकतात. फोनला 0-100 टक्के चार्ज होण्यासाठी फक्त एक सेकंद लागेल. Edward Tian यांनी एका मुलाखतीदरम्यान ही माहिती दिली आहे.

 

काय आहे ओप्पो एक्झिक्यूटिव्हचे म्हणणे?
ते म्हणाले की आम्ही अशा टप्प्यावर आहोत जिथे तुमचा स्मार्टफोन फक्त 15 मिनिटांत चार्ज होऊ शकतो. तुमच्याकडे 150W चा चार्जर असल्यास, तुम्ही 15 मिनिटांत तुमचा फोन सहज चार्ज करू शकता. (Smartphone)

 

आप्पोची उपकंपनी Realme चा फोन GT Neo 3 ला फक्त 5 मिनिटांत 50 टक्के चार्ज करू शकता. काही वर्षांपूर्वी पर्यंत असे आकडे आपल्या आवाक्याबाहेर होते. आता आपण जिथे आहोत तिथून असे दिसते की चार्जिंग टेक्नोलॉजीला मर्यादा नाही.

फास्ट चार्जिंग का नाही सोपे?
Edward Tian म्हणाले, फास्ट चार्जिंग टेक्निकल इंजिनियर म्हणून माझे काम वेळेची मर्यादा तोडणे आहे. आम्ही त्या दिवसापर्यंत संशोधन करत राहू, जोपर्यंत फक्त एका सेकंदात फोन चार्ज होत नाही.

 

हे आता होणार नाही. ओप्पो हे लगेच करणार नाही. त्याऐवजी कंपनी याकडे एक शक्यता म्हणून पाहते.
यासाठी कंपनीला लांबचा प्रवास करावा लागेल. Edward Tian यांनी कबूल केले की इथपर्यंत पोहोचणे सोपे नाही.

 

त्यांनी सांगितले की, फास्ट चार्जिंगचा चार्जिंग स्पीड वाढवणे हे आव्हान नसून यूजरला चार्जिंगचा चांगला अनुभव देणे हे एक आव्हान आहे.
यामध्ये सेफ्टी, चार्जिंग टेंपरेचर, बॅटरी सेल डेन्सिटी, बॅटरी लाइफ स्पॅम अशा अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते.

 

Web Title :- Smartphone | smartphone will charge in just one second oppo suggest future

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Price Today | सोन्यात 47 रुपयांची तेजी, चांदीत 496 रुपयांची उसळी; जाणून घ्या नवीन दर

 

Dasara Melava 2022 | दसरा मेळाव्यावरुन राजकारण पेटले ! शिंदे गटाने अर्ज दाखल करुन ठाकरे गटाला दिले आव्हान

 

ACB Trap on PSI Dilip Sapate | 45 हजाराची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक दिलीप सपाटे अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात