Smartphone वापरताना करू नका ‘या’ 10 चूका, अन्यथा फोनचा बॉम्बसारखा होऊ शकतो स्फोट; जाणून घेऊन करा बचाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Smartphone | सध्या स्मार्टफोनचा (Smartphone |) स्फोट होण्याच्या घटना वाढत आहेत. याचे प्रमुख कारण फोनची बॅटरी असते. जास्त वापरल्याने बॅटरी गरम होते आणि स्फोट होतो. कंपन्या मात्र अशावेळी यूजरला चुकीचे ठरवतात. आपण 10 अशा चूकांबाबत जाणून घेणार आहोत, ज्यांच्यामुळे फोनच्या बॅटरीचा स्फोट होण्याचा धोका असतो (10 mistakes that can cause the battery of a phone to explode).

 

या 10 चूका कधीही करू नका

1. डेमॅज स्मार्टफोनचा वापर करू नका

फोन पडला तर आणि डॅमेज झाला तर ताबडतोब वापरू नका (If the phone falls and is damaged, do not use it immediately). सर्व्हिस सेंटरमध्ये जा. फोनची स्क्रीन क्रॅक होणे, पाणी किंवा घाम जाण्याने बॅटरी काम करत नाही, असा फोन वापरणे जोखमीचे आहे.

 

2. डुप्लिकेट चार्जरचा वापर टाळा

डुप्लिकेट चार्जरचा वापर करणे टाळा (Avoid using duplicate chargers). लवकर चार्ज करण्यासाठी फास्ट चार्जिंग अ‍ॅडप्टर वापरू नका. यामुळे बॅटरीवर दबाव येतो. फोनसोबत आलेल्या चार्जरनेच फोन चार्ज करा.

 

3. बनावट बॅटरी लावू नका

फोनमध्ये थर्डपार्टी किंवा बनावट बॅटरी लावू नका (Do not install third party or fake batteries in the phone). खराब लिथियम-आयर्न बॅटरी जास्त गरम होते, यामुळे फोनचा स्फोट होऊ शकतो किंवा आग लागू शकते.

 

4. गरम झाल्यानंतर सुद्धा वापर करणे

गरम झाल्यानंतर फोन ताबडतोब चार्जिंगवरून काढा आणि बाजूला ठेवा (Remove the phone from charging immediately after heating and set aside).

 

5. कार चार्जरचा वापर टाळा

कार चार्जरचा वापर करणे धोकादायक ठरू शकते (Using a car charger can be dangerous). बहुतांश कंपन्या चार्जिंग पॉईंटसाठी थर्डपार्टी व्हेंडर्स हायर करतात. यामुळे फोनचे नुकसान होऊ शकते. त्यामध्ये आग लागू शकते.

 

6. जास्त चार्ज करणे

100 टक्के चार्ज झाल्यानंतर फोन चार्जिंग पॉईंटवरून हटवा. त्यापेक्षा जास्त वेळ ठेवू नका. ओव्हर चार्जिंगने सुद्धा फोन गरम होऊ शकतो (Overcharging can also cause the phone to overheat).

 

7. सूर्यप्रकाशात फोनचा वापर

डायरेक्ट सनलाईटमध्ये फोनचा वापर करणे टाळा (Avoid using the phone in direct sunlight). यामुळे फोन जास्त गरम होतो.

 

8. फोनवर अनावश्यक दबाव टाकणे

फोन चार्ज होत असताना सुद्धा त्याचा वापर करू नका (Do not use the phone while it is charging).
हे धोकादायक ठरू शकते.

 

9. पॉवर स्ट्रिप किंवा एक्सटेंशनचा वापर

स्मार्टफोन पॉवर स्ट्रिप किंवा एक्सटेंशन कॉर्डवर प्लग करून जार्च करू नका (Do not use power strip or extension cord).
शॉर्ट सर्किट होऊ शकते.

 

10. लोकल रिपेयर शॉपमध्ये दुरूस्त करणे टाळा

फोन नेहमी सर्व्हिस सेंटरमध्ये दुरूस्त करा (Always repair the phone in the service center).
लोकल रिपेयर शॉपवाल्यांकडून फोनच्या आतील सर्किट खराब होऊ शकते.

Web Title : smartphone tips and tricks 10 mistakes smartphone can explode or may catch fire anytime read and avoid

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update