सावधान ! सॅनिटायझरमुळे स्मार्टफोनची लागू शकते ‘वाट’, ‘या’ 3 पद्धतीने करा स्वच्छ

पोलिसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या भितीमुळे लोक प्रत्येक गोष्ट सॅनिटाइज करत आहेत. हे करत असताना ते सॅनिटायझरचा भरपूर वापर करताना दिसतात. पण मोबाईल फोन सॅनिटाईझ करताना चुकीच्या पद्धतीने सॅनिटायझर वापरल्यास तुमच्या फोनची वाट लागू शकते. सॅनिटायझरमुळे फोनचे काय नुकसान होते, हे अनेकांना माहित नाही. सॅनिटायझर वापरल्याने फोनच्या स्क्रीनसोबतच हेडफोन जॅक आणि स्पीकरदेखील खराब होऊ शकतो.

होऊ शकते हे नुकसान
सध्या दुरुस्तीसाठी येणारे अधिकांश मोबाईल सॅनिटायझरमुळे खराब झालेले आहेत. मोबाईलला सॅनिटायझर लावताना मोबाईलच्या हेडफोन जॅकमध्ये सॅनिटाईझर जाते. यामुळे फोनमध्ये शॉर्ट सर्किट होऊन फोन खराब होत आहेत. तसेच फोनचे डिस्प्ले आणि कॅमेरा लेन्स सुद्धा सॅनिटायझरमुळे खराब होऊ शकते.

ही योग्य पद्धत

1 मेडिकल वाइप्स
मोबाईल स्वच्छ करण्यासाठी कुठल्याही 70 टक्के अल्कोहोल असलेल्या मेडिकल वाइप्सचा वापर करा. याद्वारे फोन चांगल्या स्वच्छ करता येईल.

2 कापसाचा वापर
प्रथम फोन स्विच ऑफ करा. यानंतर कापसाचा एक तुकडा रबिंग अल्कोहलमध्ये बुडवून फोनची स्क्रिन सरळ धरून साफ करा. आवश्यक वाटल्यास मोबाईल कस्टमर केअरवरूनच मोबाईल स्वच्छ करण्याचा सल्ला घ्या. कारण अनेक कंपन्यांचे फोन मटेरिअल वेगवेगळे असते.

3 अ‍ॅन्टी बॅक्टेरिअल पेपर
मेडिकल्स स्टोअर्समध्ये सहजपणे अँटी बॅक्टेरिअल टिश्यू पेपर्स मिळतात. याद्वारे फोन स्वच्छ करू शकतात.