पुरूषांनो ‘स्मार्ट’ दिसण्यासाठी फॉलो करा ‘या’ 5 Smart ‘टीप्स’, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – महिलांनीच सुंदर दिसावे, असा काही लोकांचा गैरसमज आहे. आता बदललेल्या जमान्यात पुरूषांनाही आपले व्यक्तीमत्व आकर्षक ठेवण्यासाठी सौंदर्याकडे लक्ष देणे आवश्यक ठरते. महिलांसारखा मेकअप करण्याची पुरूषांना गरज नसली तरी आपल्या त्वचेची व इतर अवयवांची काळजी त्यांनी घेतलीच पाहिजे. ही काळजी घेताना काही पथ्य पाळणे खुप गरजेचे आहे. याबाबत काही स्मार्ट टीप्स आपण जाणून घेणार आहोत.

हे लक्षात ठेवा

1 केसांची काळजी घ्या
केस नीट विंचरणे, वेळच्यावेळी ते कापणे, योग्य शँपूचा वापर केल्याने चेहर्‍याला नवा लूक मिळतो तसेच तुम्ही स्मार्ट दिसता.

2 दाढी रोज करू नका
रोज दाढी केल्याने आपण तरूण दिसतो असे काहींना वाटत असले तरी यामुळे चेहरा खडबडीत होतो, त्वचेत रफनेस येतो. त्यामुळे रोज दाढी करणे टाळा.

3 चेहर्‍याची काळजी घ्या
उन्हाळ्याच्या दिवसात चेहर्‍यावर घाम येतो आणि धूळ बसते, यासाठी चेहरा दिवसातून 2-3 पाण्याने स्वच्छ करा. यामुळे वयस्करपणा न दिसता चेहरा खुलून येईल.

4 धूम्रपान करू नका
पुरूषांचे शरीर आणि सौंदर्याला स्मोकिंग बाधक आहे. या व्यसनामुळे प्रकृती खराब होते. शिवाय या सवयीचे वाईट परिणाम सर्वप्रथम चेहर्‍यावर दिसतात. सिगारेटच्या सेवनाने चेहर्‍यावर सुरकत्या पडतात, चेहरा हिरमुसल्यासारखा होतो, ओठ काळे पडतात. यामुळे तुम्ही लवकर म्हातारे होऊ शकता. स्मार्ट दिसण्यासाठी धूम्रपानापासून लांब राहा.

5 दातांची निगा राखा
चेहर्‍याच्या सौंदर्यासाठी दांतांची निगा राखणे खुप आवश्यक आहे. दात स्वच्छ आणि पांढरे शुभ्र असल्यास पुरूषांचे सौंदर्य, व्यक्तीमत्व खुलून दिसते.