‘या’ App वर महिला दाखल करु शकणार ‘लैंगिक’ अत्याचाराची ‘तक्रार’, ‘गोपनीय’ राहणार माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात महिलांबरोबर होत असलेल्या दुष्कर्माबाबतच्या तक्रारी आता एक अ‍ॅपद्वारे करता येतील. त्यासाठी आता पीडित महिलांना पोलीस स्टेशनमध्ये चकरा मारण्याची गरज भासरणार नाही. या अ‍ॅपद्वारे पीडित महिला कायद्याची सहायता घेऊ शकतात आणि वैद्यकीय सुविधा देखील मिळवू शकतात. या अ‍ॅपद्वारे महिला अशा मुद्द्यांबाबत तक्रार करु शकतील ज्याची तक्रार शक्यतो दाखल होत नाही.

पुढील आठवड्यात लॉन्च होणार अ‍ॅप –
या अ‍ॅपचे नाव स्मॅशबोर्ड (Smashboard) आहे. हे अ‍ॅप पूर्णता खासगी आणि इंक्रिप्टेट आहे. या अ‍ॅपद्वारे लैंगिक अत्याचार पीडित महिला फोटो, स्क्रीनशॉट, कागदपत्र, व्हिडिओ आणि ऑडिओ पुरावा म्हणून सेव्ह करु शकतात. या अ‍ॅपची माहिती को-फाऊंडर नुपूर तिवारी यांनी दिली. या अ‍ॅपद्वारे महिलांना वैद्यकीय आणि कायदेशीर मदत मिळेल. तिवारी यांच्या मते स्मॅशबोर्ड अ‍ॅप यूजरची लोकेशन ट्रॅक करता येणार नाही. तसेच कोणाचाही खासगी डाटा देखील हाताळणार येणार नाही.

महिलांसाठी सर्वात धोकादायक देशांच्या यादीत भारताचा क्रमांक सर्वात वर –
थॉमसन रॉयटर 2018 च्या सर्व्हेक्षणानुसार महिलांसाठी सर्वात धोकादायक देशांच्या यादीत भारताचा क्रमांक सर्वात वरचा आहे. तर भारत सरकारच्या नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीनुसार 2017 मध्ये 90 दिवसात बलात्काराच्या 32,500 तक्रारी दाखल झाल्या. भारतातील धिम्या कायदेशीर प्रक्रियेमुळे अनेक गुन्हे दाखल होऊ शकलेले नाहीत. तसेच तक्रार दाखल करणाऱ्या महिलांंवर हल्ले देखील झाले. ही माहिती मानवधिकारासाठी काम करणाऱ्या एका सदस्याने सांगितली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/